‘डीआयडी सुपर मॉम्स'च्या तिसऱ्या आवृत्तीत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने परीक्षक आणि प्रेक्षकांवर प्रभाव टाकल्यामुळे हरियाणाच्या वर्षा बुमराने जिंकला मानाचा चषक!
मुंबई, 25 सप्टेंबर 2022: तरूण मुला-मुलींनाही तीव्र स्पर्धा निर्माण करील अशी उत्कृष्ट नृत्ये सादर करणार््या काही अपवादात्मक उत्कृष्ट मातांचे दर्शन प्रेक्षकांना घडविणार््या ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या पूर्वीच्या दोन आवृत्त्यांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘झी टीव्ही’ने आपल्या या लोकप्रिय मालिकेची तिसरी आवृत्ती प्रसारित केली आहे. दर शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो मातांनी ऑडिशन्स दिल्या होत्या, पण त्यातून केवळ निवडक 12 उमेदवारांची ग्रॅण्ड प्रीमिअरसाठी निवड करण्यात आली होती. आता तीन महिन्यांच्या यशस्वी वाटचालीनंतर 25 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाची अंतिम फेरी पार पडून या आवृत्तीची सांगता झाली.
या अंतिम भागात नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा, भाग्यश्री दस्सानी आणि उर्मिला मातोंडकर या नेहमीच्या परीक्षकांशिवाय नामवंत अभिनेत्री रश्मिका मंदाना, नीना गुप्ता आणि गोविंदा हे सेलिब्रिटी विशेष परीक्षक म्हणून सहभागी झाले असल्याने नव्या विजेतीची उत्सुकता कळसाला पोहोचली होती. या अंतिम फेरीत वर्षा बुमरा, अल्पना पांडे, रिध्दी तिवारी, साधना मिश्रा, सादिका खान आणि अनिला रंजन या सहा अंतिम स्पर्धकांनी अप्रतिम नृत्ये सादर करून प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकली होती. पण त्यापैकी वर्षा बुमराने सादर केलेल्या जबरदस्त नृत्यामुळे तिची या आवृत्तीची विजेती म्हणून निवड करण्यात आली. तिला या विजेतेपदासाठी साधना मिश्रा आणि सादिका खान या दोघी अंतिम स्पर्धकांनी सादर केलेल्या नृत्याशी तीव्र स्पर्धा करावी लागली होती. त्यानंतर लोकप्रिय मतांच्या आधारे या दोघींची अनुक्रमे पहिली आणि दुसरी उपविजेती म्हणून निवड करण्यात आली.
इतकेच नव्हे, तर एव्हरग्रीन अभिनेता गोविंदाने मंचावर विजेता चषक आणला आणि त्याने अल्पना पांडे हिच्याबरोबर ‘आपके आ जाने से’ या त्याच्या लोकप्रिय गाण्यावर जोरदार नृत्यही केले. त्यानंतर नीना गुप्तानेही सहाही अंतिम स्पर्धकांबरोबर तिच्या ‘चोली के पीछे क्या है’ या जबरदस्त गाण्यावर नृत्य केले. इतकेच नव्हे, तर सध्या देशभरातील तरुणांची आवडती अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने गोविंदाबरोबर त्यांच्या ‘सामी सामी’ तसेच ‘आ आ ई उ उ ओ मेरा दिल ना तोडो’ या गाण्यांवर नृत्य केले. पण त्यांची ही नृत्ये पाहिल्यावर परीक्षक रेमो डिसुझालाही राहावले नाही आणि त्याने रश्मिकाबरोबर तिच्या ‘श्रीवल्ली’ या प्रसिध्द गाण्यावर नृत्य केले. या अनपेेक्षित नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांना आनंदाचा सुखद धक्का बसला. यानंतर सर्व सहाही स्पर्धक, नृत्यदिग्दर्शक आणि सर्व परीक्षकांनी बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदाच्या लोकप्रिय गाण्यांवर नृत्ये सादर करून त्याला आदरांजली वाहिली.
‘डीआयडी सुपर मॉम’च्या तिसर््या आवृत्तीची विजेती वर्षा बुमरा म्हणाली, “या स्पधेने माझं स्वप्न साकार केलं आहे. ‘डीआयडी सुपर मॉम’मधील माझ्या वाटचालीने मला खूप काही शिकवलं. मी हा चषक जिंकला, त्याचा मला विशेष आनंद होत आहे कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूपच मेहनत घेतली होती. माझ्यातील नृत्यकलेचा विकास करून त्याद्वारे मला उत्तम नृत्यांगना बनवून ही स्पर्धा जिंकण्यात मदत केलेली माझी मार्गदर्सक वार्तिका जैन यांची तसंच सर्व परीक्षकांची मी मनापासून आभारी राहीन. ही स्पर्धा निश्चितच तशी अवघड होती आणि माझ्या प्रत्येक सहस्पर्धकाकडूनही मला बरंच काही शिकायला मिळालं. आता या संस्मरणीय वाटचालीची सांगता करताना या काळात मला मिळालेल्या या नव्या मैत्रिणींशी मी नातं जपीन आणि मिळालेल्या नव्या ज्ञानाचा वापर करीन. तसंच इतके दिवस आम्ही करीत असलेला सराव आणि त्यावेळची धमालमस्ती यांची मला खूप आठवण येत राहील. माझ्यातील नृत्यगुण सादर करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी ‘डीआयडी सुपर मॉम’ आणि झी टीव्ही यांची खूपच आभारी राहीन.”
विजेती वर्षाबद्दल बोलताना परीक्षक रेमो डिसुझा म्हणाला, “माझ्या मते या अंतिम फेरीतील सर्व सहाही स्पर्धक हे विजेते आहेत. अर्थात कोणा तरी एकीलाच आम्हाला विजयी घोषित करावं लागतं. त्यामुळे वर्षाचा विजय हा तिने आपल्या कर्तृत्त्वाने मिळविला आहे. इतक्या अप्रतिम नृत्यगुणांचा आविष्कार माझ्यासमोर घडताना पाहण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मला आनंद वाटतो. ‘डीआयडी सुपर मॉम’ची ही आवृत्ती हा सर्वांसाठी एक आनंददायक आणि धमाल अनुभव ठरला आहे. हे सर्व स्पर्धक मला प्रिय आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीत मी खूप यश आणि शुभेच्छा व्यक्त करतो.”
परीक्षक उर्मिला मातोंडकर म्हणाली, “हिंदी या कार्यक्रमात काम करताना मला खूप छान अनुभव आला आणि मी वर्षाचं खूप अभिनंदन करते आणि मला तिचा खूप अभिमानही वाटतो. तिचा हा विजय म्हणजे तिने या संपूर्ण आवृत्तीत घेतलेले कष्ट आणि नृत्याबद्दलचं प्रेम, याचाच हा परिणाम आहे. माझ्या अन्य परीक्षकांबरोबर काम करताना मला खूप छान अनुभव आला.”
परीक्षक भाग्यश्री म्हणाली, “तुझं खूप अभिनंदन, वर्षा! मी हिला चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून नृत्य करताना पाहात आहे आणि तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालं, याचा मला आनंद वाटतो. या व्यासपिठामुळे या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाचा विकास झाला, हे पाहून मला खूप समाधान वाटतं आणि ते स्पर्धेच्या प्रारंभापासून आता खूपच अधिक प्रगल्भ झाले आहेत. या कार्यक्रमाने आता माता झालेल्या महिलांना त्यांचं नर्तिका होण्याचं स्वप्न प्रत्यक्ष साकार होण्यास निश्चितच मदत मिळेल आणि इतरांना प्रेरणा मिळेल. या स्पर्धकांच्या कुटुंबियांनाही आपल्या कुटुंबातील महिलांना त्यांची स्वप्न साकारण्यासाठी उत्तेजन देण्याची प्रेरणा मिळेल. यातील सर्व स्पर्धकांना माझ्या शुभेच्छा!”
एकंदरीतच ‘डीआयडी सुपर मॉम’च्या तिसर््या आवृत्तीचा अंतिम भाग दणक्यात साजरा झाला!
No comments:
Post a Comment