एण्ड टीव्हीवरील ‘घरेलू कॉमेडी’ ‘हप्पू की उलटन पलटन’ भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कपाळावरून येणारे तेलकट केस, तोंडामध्ये चघळणारे पान, वैशिष्ट्यपूर्ण मिशी व धमाल ढेरपोट्या दरोगा हप्पू सिंगने (योगेश त्रिपाठी) प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट केले आहे. ही मालिका दरोगा हप्पू सिंग, त्याची ‘दबंग दुल्हनिया’ राजेश (कामना पाठक), हट्टी आई कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) आणि त्याच्या नऊ खोडकर मुलांच्या विलक्षण कृत्यांना सादर करते. या अत्यंत लोकप्रिय दबंग जोडीने काशीनगरीला भेट देऊन स्थानिक देवदिवाळी उत्सवाचा आनंद घेतला, अनेक घाटस्थळी गेले, गंगानदीच्या काठी बोट रायडिंगचा आनंद घेतला, स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला आणि शहरातील प्रसिद्ध स्टोअर्समध्ये खरेदी केली.
वाराणसीला दिलेल्या भेटीबाबत सांगताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, “सर्व काशी रहिवाशांना देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आमची मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’चे उत्तरप्रदेशमध्ये निष्ठावान चाहते आहेत, याच कारणामुळे आम्ही घाटचे शहर वाराणसीला भेट देऊन येथील प्रेक्षकांसोबत संवाद साधण्याचे ठरवले. वाराणसी हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे आणि येथे जगप्रसिद्ध मंदिरे आहेत, जी लाखो भक्तांचे लक्ष वेधून घेतात. आणि यासाठी देवदिवाळीसारखा उत्तम क्षण कोणताच नाही, जेथे अद्वितीय व अचंबित करणारे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. आम्ही जेथे जातो तेथे आमचे चाहते आम्हाला आमचे धमाल संवाद व माझा प्रसिद्ध संवाद ‘अरे दादा!’ म्हणत अभिवादन करतात, ज्यामुळे मला खूप आनंद होतो. मी आमच्या कामाचे कौतुक करण्यासाठी प्रेक्षकांचे आभार मानतो आणि आम्ही प्रेक्षकांचे अधिकाधिक विनोदी एपिसोड्ससह मनोरंजन करत राहण्याची आशा व्यक्त करतो. आम्ही येथील प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्यासोबत प्रेक्षकांसोबत संवाद साधला, स्ट्रीट फूड व शॉपिंगसाठी स्थानिक गंतव्यांना भेट दिली आणि घाटवर बोट रायडिंगचा आनंद घेतला. आम्ही शहरातील काही स्वादिष्ट मिष्टान्नांचा आस्वाद घेतला, जसे टमाटर चाट व लिट्टी चोखासह कुल्हड की चाय. शिव की नगरीने मला पुन्हा एकदा आकर्षून घेतले. पण मी वर्षातून शहराला ही माझी दुसरी भेट होती. मला येथे जितका आनंद मिळेल तो कमीच आहे. आणि मी येथे सतत येत राहिन. हर हर महादेव!’’ वाराणसीला पहिल्यांदाच भेट देण्याबाबत कामना पाठक ऊर्फ राजेश सिंग म्हणाल्या, ‘’देवदिवाळीच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा! आमची मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ मजेशीर ढेरपोट्या हप्पू सिंग, त्याची दबंग दुल्हनिया रज्जो व त्यांची अविश्वसनीय विनोदीशैली आणि कानपुरिया भाषेमधील धमाल कृत्यांना सादर करते, ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, ज्यामुळे ही सर्वात लोकप्रिय मालिका बनली आहे. म्हणून यंदा अधिक हास्याचा डोस देण्यासाठी आणि शहरातील उत्सवी धमाल पाहण्यासाठी आम्ही काशीला भेट देऊन प्रेक्षकांसोबत संवाद साधण्याचे ठरवले. मी वाराणसीबाबत भरपूर काही ऐकले होते, पण येथे भेट देण्याची कधीच संधी मिळाली नाही. मी पहिल्यांदाच येथे भेट दिली आणि मी येथील संस्कृती, लोक, फूड, शॉपिंग व एकूण उत्साह पाहून भारावून गेले. वारासणसीमध्ये घाट ते राजवाडे असे बरेच काही पाहण्यासारखे आहे आणि या सर्व दृश्यांसह सकाळी लवकर बोट रायडिंग करणे मनमोहक आहे. वाराणसी हे खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी खाद्यपदार्थांचे पॅराडाइज आहे, जसे स्वादिष्ट स्ट्रीट फूड, विशेषत: कचोरी-सब्जी जिलेबी, गोलगप्पे आणि थंडाई यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे. मी शहराचे सौंदर्य व भव्य साजरीकरण पाहून अचंबित झाले; आम्हाला काशीला भेट देण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. रस्त्यांवरील लोकांनी आम्हाला लगेच ओळखले आणि आमच्यासोबत अभिवादन केले. मी त्यांचे प्रेम व आपुलकी पाहून आनंदित झाले. हा अनुभव नेहमीच माझ्या स्मरणात राहिल.’’
पहा योगेश त्रिपाठी यांना दरोगा हप्पू सिंगच्या भूमिकेत आणि कामना पाठक यांना राजेश सिंगच्या भूमिकेत ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
A solution to your hacking problems and it comes with ease you just need to follow instructions given to you cause they work as a cooperation and they are kin on following instructions given to them, they made me understand the meaning of a 100% job .Hackingssolution AT gmail DOT com They can help with your bad credit score,recover stolen funds,Give access to any given gadget or app you place in front of them they just need the number or email linked to it,they can change your bad school grades, clear criminal records on database etc contact them via Whatsapp +14106350697.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete