Tuesday, 21 February 2023

बेळगांव येथील 'पहिल्या बालनाट्य संमेलना'ची लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता!


नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजेकरमणूक केली पाहिजेहे जेव्हा त्यांना कळेलतेव्हा मुले नाटकाकडे येतील....! - अभिनेता सुबोध भावे

मुलांच्या भूमिकेतून  बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे  आवश्यक आहेत. - अभिनेता सुबोध भावे

बालनाट्याची परंपरा संपली आहेलहान मुलांसाठी  चित्रपट नाहीमालिका नाहीकाही नाही !. - अभिनेता सुबोध भावे

पुण्यात मुलांना खेळायचे मैदान नाहीइथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते. - अभिनेता सुबोध भावे

बेळगांव : बेळगांवमध्ये प्रसिद्ध अश्या अनघोळ येथे मुंबईच्या 'बालरंगभूमी अभियान'द्वारे  '१ल्या बेळगांव बालनाट्य संमेलना'चा प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ रविवारी संपन्न झालायाप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, "मला वडिलांनी  सहावीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलंयामुळे माझा बालनाट्याशी संबंध आलाआपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहेगेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले कीबालनाट्याची परंपरा संपली आहेलहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाहीमालिका नाहीकाही नाही आहेआपण मुलांसाठी काही करत नाहीसमाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाहीही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहेपुण्यात मुलांना खेळायचे असेलतर दुर्दैवाने मैदान नाहीइथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होतेउत्तम बाग नाहीजिथे मुले खेळू शकतातमुलांनी खेळायचे नाहीअसे आपण ठरवले आहेकोरोनाच्या काळात आपण मुलांना मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातलेआता ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड गोष्ट झाली आहेमी लहानपणी जी बाल नाटके पाहिलीत्याची छबी आजही मनावर ताजी आहेआपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेतजे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतीलआपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टाहास आहेतो नाटकातून बाजूला व्हायला हवाघरी आई - बाबा शहाणपणा शिकवतातशाळेत शिक्षक शहाणपणा शिकवतातपरत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहेमुलांना एक सकस मनोरंजन पाहिजेनाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजेनाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजेहे जेव्हा त्यांना कळेलतेव्हा मुले नाटकाकडे येतील".

बेळगांवच्या अनघोळ येथील ‘संत मीरा हायस्कूलमध्ये सकाळच्या प्रहरात आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यशाळांमधे मुंबईबेळगांवकोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेया कार्यशाळांमध्ये बेळगांवमधील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थीविद्यार्थिनी सहभागी झाले होते६०६० विद्यार्थ्यांचे गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केलीगेली दोन दिवस बेळगावातील अनेक विद्यार्थ्यांना नाट्यसंमेलनात प्रशिक्षणसोबतच विविध बालनाट्य पहाण्यासाठी मशगूल होतेयासोबतच त्यांनी अभिनेते सुबोध भावेअभिनेत्री सई लोकूरअभिनेते प्रसाद पंडितसंमेलन अध्यक्षा मीनाताई नाईक, 'बालरंगभूमी अभियान,मुंबई', 'फुलोरा नाट्य संस्थे'च्या अध्यक्षा वीणाताई लोकूर, 'अखिल भारतीय नाट्य परिषद', बेळगांव अध्यक्षा संध्याताई देशपांडेडॉ.राजेंद्र चव्हाणदेवदत्त पाठक आदी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा करून मनसोक्त आनंद लुटला.

पहिल्या गटातील कार्यशाळेत देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी मुद्राअभिनयसंघर्षकथानकाचं बीजकथानककथानक आणि उपकथानकाची जोडणीखलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतलीती कौशल्ये देहबोलीसंवादविसंगतीअभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केलीसभोवतालची माणसेआजूबाजूला घडणाऱ्या घटनाचांगल्या गोष्टी कृतीत आणणेआदी स्वत:च्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावाहे ही कार्यशाळेत सांगण्यात आलंयातील मुलांशी पत्रकार शीतल करदेकरप्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला.

दुसऱ्या गटाचे संचलन राजेंद्र चव्हाण यांनी केलेतर जितेंद्र रेडकरओम कृष्णजी यांनी त्यांना मदत केली.राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतलेया  मुलांशी पत्रकार कपिल प्रभूअतुल कुलकर्णीनितीन फणसे आणि राम कोंडीलकर यांनी संवाद साधलानाटकात काय करणे अपेक्षित आहे हे शिक्षकांनी आज शिकवल्याचे मुलांनी सांगितलेखेळातून कॉन्सन्ट्रेशन करायला शिकल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता.

गट क्रमांक तीनमधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते.. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केलीयातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकरयुवराज अवसरमलयोगेश घागअभिजित जाधव  यांनी संवाद साधलागट क्रमांक चारचे नेतृत्व नयना डोळसभरत मोरेमयुरी मोहितेलीला हडप यांनी केलेतर नीता कुलकर्णीअर्चना ताम्हनकर यांनी त्यांना मदत केली.

चौथ्या गटात शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते घेतलीशिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद - वाचक अभिनयभूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केलेत्यांना मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळलेयात सहभागी झालेल्या शिक्षक  पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरेनरेंद्र कोठेकर आणि सौमित्र पोटे यांनी संवाद साधलाया चार गटातील विधार्थीपालकशिक्षक यांच्याशी  चर्चा करून पत्रकारांनी आढावा घेतला.

दुपारच्या सत्रात 'शिरगांव हायस्कुल', शिरगांव यांच्या विद्यार्थ्यांनी 'धरतरी', तसेच 'नाट्यसंस्कार कला अकादमी', पुणे यांनी  'जीर्णोद्धार', तर 'रंगभूमी अभियान', तळेगांव यांनी 'माझी मायही बालनाट्ये सादर करण्यात आलीयावेळी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावेबेळगांव येथील प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडितअभिनेत्री सई लोकूरसंमेलन अध्यक्षा मीना नाईकवीणा लोकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बालनाट्य सुरु होण्यापूर्वी जेष्ठ संपादक प्रफुल्ल फडके आणि पत्रकार शीतल करदेकर यांनी  संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतलीतर अभिनेत्री सई लोकूर आणि वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनीत मासावकर आणि कपील प्रभु यांनी घेत त्यांचा बाल नाट्य रंगभूमीवरील प्रवास उलगडून दाखविला.

मुंबईच्या 'बालरंगभूमी अभियानसंस्थेतर्फे ‘पहिल्या बेळगांव बालनाट्य संमेलनाचे’ आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य लाभले.

 संमेलनाध्यक्ष मीना नाईकउद्धघाटक सई लोकूरस्वागताध्यक्ष संध्या देशपांडेबालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूरअभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाणसचिव देवदत्त पाठकपत्रकारशिक्षकविद्यार्थी आदी मान्यवर  उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment