शनिवारी फेब्रु. २५ रोजी गिरगावाकरांसाठी बहारदार संगीत मेजवानी!
प्रवेश सर्वांना विनामूल्य!
मुंबईतील 'सूर-ताल' ही संस्था गेली अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रमांसोबतच संगीतकलेची उपासना करीत आहे. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंत यांच्यासाठी 'सुर ताल'चे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे. अगदी करोना काळात सुद्धा 'ऑनलाईन'च्या माध्यमातूनही अनेक रसिकांचे मनोरंजन करण्यात 'सुर ताल' आघाडीवर होती. 'मराठी भाषा दिन' सप्ताहाच्या निमित्ताने संगीत माध्यमाद्वारे साऱ्या विश्वात मराठी टक्का वाढविणाऱ्या भगिनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अश्या भोसले यांच्या अवीट गोडीच्या निवडक गाण्यांची सदाबहार मैफिल शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ यादरम्यान चित्तपावन ब्राम्हण संघ, शं वि. सोवनी पथ, गिरगांव मुंबई ४०० ००४ येथे खास गिरगावाकरांसाठी आयोजित करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. अमृता, सुजाता, धनंजय आणि ज्ञानेश हे गायक या संगीत मैफिलीत आपल्या सुमधुर आवाजाने रंग भरणार आहेत.
No comments:
Post a Comment