22 फेब्रुवारी, 2023: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने ग्रँड मराठा फाउंडेशन या महाराष्ट्रातील नॉन-गव्हर्न्मेंटल ऑरगनायझेशनतर्फे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या 500 पेक्षा जास्त व्यक्तींनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी अनेक डॉक्टर आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि स्थानिकांना मदत केली. ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे या ठिकाणी औषधांचे वाटप करण्यात आले.
ग्रँड मराठा फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती माधवी शेलटकर यांच्या सहाय्याने या वैद्यकीय शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असलेले मेयर व्हायटाबायोटिक्सचे संचालक श्री. राजेश तावडे यांनी आपले विचार मांडले आणि सुदृढ निरोगी राहण्याच्या फायद्यांवर भर दिला. या उपक्रमासाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. बालाजी किणीकर, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील, अंबरनाथ भाजपाचे अध्यक्ष अभिजीत करंजुळे आणि भाजपाचे महेश मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
चित्रपट निर्माते व ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक श्री. रोहित शेलटकर म्हणाले, "सर्वांना समान संधी मिळवून देण्याचा ग्रँड मराठा फाउंडेशन निर्धार आहे. या तत्वासह जीएमएफ वंचितांना पुढे नेण्यासाठी आणि त्यांचे कल्याण साधण्यासाठी सातत्याने काम करते. सुदृढ आणि निरोगी राहण्याला काहीही पर्याय नाही आणि सर्व स्तरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी झाली पाहिजे आणि वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत. वंचितांना आरोग्य व स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा प्राप्त होतील, याची खातरजमा वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून होते. श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने अंबरनाथमधील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करताना जीएमएफला अत्यंत आनंद होत आहे."
मराठा सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती महोत्सव समिती, अंबरनाथ ठाणे यांचे समन्वयक बाळकृष्ण परब यांनी या शिबिराचे यशस्वी आयोजन केले.
ग्रँड मराठा फाउंडेशनबद्दल :
ग्रँड मराठा फाउंडेशन शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक मदत उपलब्ध करून देते. यात शेतमालालायोग्य किंमत मिळण्यापासून ते उत्तम वितरण, आधुनिक तंत्र यांचा समावेश आहे. जेणेकरून शेतकर्यांना अधिक चांगली उपजीविका प्राप्त करून देऊन आणि कर्ज व गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सबलीकरण करता येईल. विदर्भावर विशेष भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्तम मुलांना शिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. कृषि व ग्रामीण क्षेत्रात या संस्थेतर्फे अनेक पूरक उपक्रम राबविण्यात येतात, ज्यात विधवांचा समावेश आहे. त्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात येतात. शाळांना संगणकाची देणगी देऊन त्यांनी ई-अध्ययनाचा परिचय करून दिला आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्
No comments:
Post a Comment