Thursday, 8 June 2023

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये १६३ किलो वजनाच्या महिलेचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण झाले, अनेक अडचणींवर मात करून जुळ्यांना जन्म दिला

मुंबई, 8 जून 2023: अतिशय धैर्याने व निर्धारपूर्वक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला जाण्याची लक्षणीय घटना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये घडली आहे. ३७ वर्षांच्या श्रीमती शीतल यांनी (नाव बदलण्यात आले आहे) अनेक वैद्यकीय अडचणींवर मात करून मातृत्व मिळवण्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे. स्थूलपणा७०.६ बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि गर्भारपणात तब्बल १६३ किलोपर्यंत वाढलेले वजन असून देखील आयव्हीएफमार्फत गर्भवती राहिलेल्या श्रीमती शीतल यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये जुळ्या मुलींना यशस्वीपणे जन्म दिला आहे.

मातृत्व मिळवण्यासाठी श्रीमती शीतल यांनी केलेली वाटचाल त्यांचा अढळ निर्धार दर्शवते. या निर्धाराच्या जोरावर त्यांनी स्थूलपणावरून टीका टोमणे व गर्भवती राहण्याचे अयशस्वी प्रयत्न सहन करण्याच्या तब्बल एक दशकभराच्या संघर्षात यश मिळवले. मूल व्हावे यासाठी दहा वर्षे केलेले प्रयत्न असफल ठरले आणि अखेरीस श्रीमती शीतल यांनी आपल्या व्यावसायिक जीवनातून १८ महिन्यांचा ब्रेक घेतला आणि मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यावेळी देखील  बीएमआय खूप जास्त असल्यामुळे त्यांना अनेक अडीअडचणी सहन कराव्या लागत होत्या.

श्रीमती शीतल सांगतात"मोठी होत असताना मला स्थूलपणामुळे बॉडी शेमिंगचा खूप त्रास सहन करावा लागला. लग्नानंतर एक दशकभर मी मातृत्वाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत होते. वजन जास्त असून देखील मला वाटत होते कीमला फक्त थायरॉईड आहे आणि स्थूलपणाशी संबंधित कोणतीही इतर व्याधी गर्भवती राहण्याच्या माझ्या क्षमतेच्या आड येत नव्हती."

श्रीमती शीतल यांची केस विशेष दखल घेण्याजोगी आहे कारण अनेकदा स्थूलपणामुळे नियमित ओव्ह्युलेशन रोखले जाते आणि आयव्हीएफ यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीय प्रमाणात कमी होते.  याशिवाय स्थूल महिलांना गर्भपातमुदतपूर्व प्रसूतीगर्भावस्थेमध्ये होणारा मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या गुंतागुंती होण्याची शक्यता जास्त असतेत्यामुळे त्यांची गर्भधारणा खूप जास्त जोखमीची मानली जाते.

श्रीमती शीतल यांच्या आयव्हीएफ स्पेशालिस्टने त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अनेक धोके असून देखील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये कन्सल्टन्ट गायनॅकोलॉजिस्टऑब्स्टट्रिशियन आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ रेणुका बोरिसा यांच्या नेतृत्वाखालील समर्पित हेल्थकेयर टीमने श्रीमती शीतल यांच्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले. सिझेरियन सेक्शनमार्फत प्रसूती करवूनजुळ्यांची डिलिव्हरी करवणाऱ्या डॉ बोरिसा यांनी सांगितले"स्थूलपणाची व्याधी असलेल्या महिलेच्या गर्भारपणावर खूप बारकाईने लक्ष ठेवावे लागते.  ऑपरेशन थिएटर आणि मॉनिटरिंगसाठी लागणारी उपकरणे इत्यादी अनेक गोष्टी सदैव तयार ठेवाव्या लागतात."

प्रसूती सुरक्षितपणे पार पडावी यासाठी डॉ बोरिसा आणि त्यांच्या टीमने प्रयत्नांची शर्थ केली. मुदतपूर्व प्रसूती होऊ नये यासाठी गर्भाशयाच्या तोंडाला टाके घालण्याची सर्व्हायकल सेर्कलजची प्रक्रिया आणि सिझेरियन सेक्शनमध्ये पोटाच्या महत्त्वाच्या टिश्यूमधून नेव्हिगेट करणे यांचा यामध्ये समावेश होता.  श्रीमती शीतल यांचा बीएमआय खूप जास्त असल्याने अनेक आव्हाने होतीत्यासाठी वैद्यकीय तज्ञांनी लक्ष घालणे अत्यावश्यक होते. फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टम (एफटीएसएस) आणि मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन यामुळे समर्पित विशेषज्ञ उपलब्ध होणे सोपे बनले.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले"कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आम्ही आमच्या रुग्णांना अतुलनीय देखभाल पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोकेसमध्ये कितीही गुंतागुंत असली तरी आम्ही कधीच हार मानत नाही. अशा दुर्मिळ केसेस हाताळण्यासाठी विशेष कौशल्ये व संसाधने आवश्यक असतात त्यामुळे खूपच कमी रुग्णालये ते करू शकतात. अनेक विविध प्रकारच्या विशेष सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देण्याची कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईची क्षमता अनन्यसाधारण आहे.  अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सनिओनेटल इंटेन्सिव्ह केयर युनिट यासारख्या सुविधांनी या केसमध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे."

ते पुढे म्हणाले, "श्रीमती शीतल यांचे एका दशकापासूनचे मातृत्व मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात लक्षणीय भूमिका बजावल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे."

मुदत पूर्ण होण्याच्या एक महिना आधी जन्मलेली असून देखील निओनेटल इंटेन्सिव्ह केयर युनिटमध्ये काही काळ राहिल्यानंतर ही बाळे उत्तम आहेत. त्यांना ८ मे रोजी घरी पाठवण्यात आले.  त्यांच्या आईचे दशकभरापासूनचे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण झाले.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये यशस्वीपणे पूर्ण झालेला श्रीमती शीतल  यांचा मातृत्वाचा प्रवास अनेक महिलांसाठी आशेचा किरण बनला आहे.  कितीही कठीण आव्हाने असली तरी यश संपादन करण्याच्या अमर्याद क्षमता यामधून दिसून येतात.  निर्धार व धैर्य यांचे बळ किती असीम आहे हे यातून दर्शवले गेले आहे.

No comments:

Post a Comment