Monday 28 August 2023

कर्करोग तपासणी आणि लवकर निदान यात सुधारणा होण्यासाठी भारतातील मुंबई आणि पुड्डूचेरी येथे कार्किनोस हेल्थकेअर आणि बेयर यांची भागीदारी


·         कर्करोगाचे लवकर निदान होण्याच्या कामात परिवर्तन घडवून आणत मुंबई आणि पुड्डूचेरी येथे कार्किनोस हेल्थकेअर आणि बेयर यांची भागीदारी

·         तोंडस्तन, गर्भाशयकोलोरेक्टल आणि प्रोस्टेट हे गंभीर कर्करोग ओळखण्यासाठी समाज स्तरावर चांगल्या सक्षम सुविधा उभारणी करणे हा या भागीदारीचा उद्देश

मुंबईभारत २८ ऑगस्ट २०२३: कार्किनोस हेल्थकेअर आणि जागतिक जीवन विज्ञान क्षेत्रातील अग्रणी बेयर हे भारतातील मुंबई आणि पुड्डूचेरी येथे टार्गेट समुदायांमध्ये कर्करोग तपासणी सुविधा वाढवण्यासाठी सहयोग करत आहेत. या सहयोगातून लवकर निदान यावर असलेला कार्किनोसचा भर आणि “सर्वांसाठी आरोग्य” हा बेयरच्या दृष्टीकोन यांची सांगड घालण्यात येत असून पुढील दोन वर्षांमध्ये लक्ष्यित समुदायांमधील कर्करोग निगराणीतील असमानता दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारेतोंडस्तन, गर्भाशयकोलोरेक्टल आणि प्रोस्टेट या प्रकारच्या कर्करोगांवर लक्ष केंद्रित करून १००,००० व्यक्तींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम समाज आणि स्थानिक संस्थांच्या सहयोगातून लक्षपूर्वक कार्य करून निरंतर काळजी सेवा  सुनिश्चित करतो.

 

बेयरच्या ऑन्कोलॉजी सस्टेनेबिलिटी अँड हेल्थ इक्विटीच्या ग्लोबल हेड डॉ. चित्कला कालिदास म्हणाल्या“बेयरच्या व्यापक जागतिक आरोग्य सेवा क्षमता आणि कार्किनोस हेल्थकेअरच्या कर्करोगाचे लवकर निदान करून देण्याच्या कौशल्याचा उपयोग करून आम्ही मूलभूत बदलाचा प्रवास सुरू करत आहोत. कर्करोग तपासणीची पुर्नव्याख्या करण्यासाठी आमच्या सहयोगी प्रयत्नाचे  डिझाइन केलेले आहे. आरोग्य साक्षरता वाढवून आणि लवकर निदान करून वेळेवर उपचार मिळण्यासाठी हे डिझाईन विकेंद्रित अशा उच्च-गुणवत्तेच्या कर्करोगाच्या निगराणीसाठी एक नाविन्यपूर्ण मॉडेल म्हणून उदयास आले आहे. या प्रयत्नांद्वारेआम्ही आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि समाजात रुग्ण-केंद्रित कर्करोग सेवा सुविधा देण्यासाठी तळागाळात सुविधा यंत्रणा निर्माण करत आहोत.”

बेयर फार्माचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज सक्सेना म्हणाले, "आम्ही जागतिक स्तरावर 'सर्वांसाठी आरोग्यया आमच्या वचनबद्धतेला गती देत आहोत. बेयरच्या आरोग्य शाश्वत उपक्रमांच्या केंद्रस्थानी भारत आणि विशेषत: ऑन्कोलॉजी आणि महिलांचे पुनरुत्पादक आरोग्य क्षेत्र आहे. भारतात कर्करोग निदान आणि उपचार यात सुधारणा करण्यासाठी कार्किनोस हेल्थकेअरसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त सकारात्मक आरोग्य परिणाम मिळविण्यासाठी तपासणी आणि वेळेवर निदान महत्त्वपूर्ण आहे. प्रगत तपासणी तंत्रज्ञान आणि उपायांच्या उपलब्धतेमुळेविविध प्रकारच्या कर्करोगांचे लवकर  निदान होणे शक्य आहे. कार्किनोस हेल्थकेअर सोबतच्या आमच्या सहकार्यामुळे गरजूंसाठी नवीन तपासणी तंत्रज्ञानाचा अॅक्सेस वाढेल आणि त्यामुळे वेळेवर निदान सर्वांसाठी एक वास्तविकता बनेल.”

कार्किनोस हेल्थकेअरच्या केरळ ऑपरेशन्सचे सह-संस्थापकवैद्यकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मोनी अब्राहम कुरियाकोस म्हणाले, “कर्करोगावर मात करण्यासाठीअधिक प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचारांना सक्षम करत लवकर निदान होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहेबेयरसोबत काम करत असताना आम्ही भारतात कर्करोगाचे लवकर निदान कसे होईल यासाठी काम करण्याच्या प्रयत्नाना सुरुवात करत आहोत. आरोग्यसेवा सुलभ बनवण्याचे आमचे उद्दिष्ट देशातील सर्वांना उपलब्ध होणारी आणि परवडणारी कर्करोग देखभाल सेवा देण्याच्या आमच्या ध्येयाशी एकदम जुळणारे आहे. हा प्रकल्प एका मार्गदर्शक प्रकाशासारखा असून पोहोचायला सोप्या सहज आरोग्यसेवानवीन कल्पना आणि स्मार्ट भागीदारी यांना एकत्र आणतो. कर्करोगाशी लढा देताना आणि आमच्या समाजाला मदत करण्यात खरा बदल घडवून आणण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. हे केवळ औषधांबद्दल नाही तर जीवनमान सुधारणेलोकांना शक्ती देणे आणि कर्करोगाने बाधित प्रत्येकासाठी चांगले भविष्य घडवणे याबद्दल आहे.”

या सर्वसमावेशक कर्करोग तपासणी आणि लवकर निदान करण्याच्या उपक्रमामध्ये सहभागींना पद्धतशीरपणे आमंत्रित करणेवैयक्तिक जोखमीच्या मूल्यांकनावर आधारित तपासणी चाचण्या घेणेनिदानाचे मूल्यमापन करणे आणि रुग्णांना उपचारासाठी योग्य वैद्यकीय केंद्रांकडे पाठवणे यांचा समावेश असेल. या प्रदेशांमधील विविध समाज विभागात कर्करोग जागरूकता आणि तपासणी वाढवण्यासाठी कार्किनोस त्यांच्या सध्याच्या नेटवर्कचा वापर करेल. बेयर आरोग्य सेवेतील कौशल्यासाठी प्रसिद्ध असून कर्करोग उपचारांसाठी शाश्वत परिसंस्था निर्माण करण्यासाठी काम करेल. ही भागीदारी दोन्ही संस्थांच्या आरोग्यसेवा सुविधा वाढविण्याच्या आणि असमानता कमी करण्याच्या उद्देशकार्याशी सुसंगत अखंडपणे काम करत आहे.

No comments:

Post a Comment