मुंबई ३ ऑक्टोबर, २०२३ : संगीताचं खरं सौंदर्य म्हणजे ते कुठलीही मर्यादा न जुमानता लोकांना जोडत. संगीत न आवडणारा व्यक्ती या जगात शोधून देखील सापडणार नाही. संगीत प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य आणत, उभारी आणत... संगीत म्हणजे ध्यास, निखळ आनंद. कोणत्याही कलेला आपण एखाद्या साच्यात बंदिस्त करून ठेऊ शकत नाही. अगदी तसंच गाण्याचं देखील आहे. कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीस असा एक संगीतमय कार्यक्रम आणला ज्याने तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या कार्यक्रमात आपण गाण्याच्या विविधशैली ऐकल्या, त्यांनी आपली मन देखील जिंकले. आणि आता हा मंच पुन्हाएकदा सज्ज झाला आहे, महाराष्ट्रातल्या संगीत प्रेमींनसाठी काहीतरी नवीन घेऊन. प्रेक्षकांचा आवडता चैतन्यपूर्ण गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम "सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा" सुरू होत आहे कलर्स मराठीवर. कार्यक्रमाचा रंगमंच सूर आणि तालाने पुन्हा बहरणार पण यावेळेस जरा वेगळे घडणार. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं असतं, पण... नवंही हवं असतं. आजवर या मंचावर आपण सगळ्यांनी अनेक सुप्रिसद्ध गाणी ऐकली त्यांचा आनंद घेतला. पण आता मात्र या गाण्यांना आजची तरुण पिढी एका नव्या ढंगात, नव्या रुपात सादर करणार आहेत आणि हे शिवधनुष्य या कार्यक्रमातील स्पर्धकांनी उचलले आहे. रंगमंचावर सप्तसुरांची उधळण होणार, नवनवे आविष्कार प्रत्येक आठवड्यात सादर होणार. मंच सज्ज आहे तुम्ही देखील सज्ज व्हा या सुरेल मैफिलीसाठी. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. उत्तमातून उत्तर सूर शोधण्याचा हा ध्यास सुरू होत आहे ७ ऑक्टोबरपासून शनि - रवि रात्री ९. ०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण पर्वात जुनी गाणी नव्या रुपात सजणार आहेत. प्रत्येक गाण्याला नाविन्याची किनार असणार आहे. आणि ही जबाबदारी मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे आजची महाराष्ट्राची तरुण पिढी. कारण तरुण पिढीकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यांच्यात एक जिद्द असते, एक प्रकारची वेगळी ऊर्जा असते काहीतरी वेगळं करून दाखविण्याची. कार्यक्रमाच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून निवडलेल्या १२ सूरवीरांमध्ये रंगणार आहे सामना. कोण ठरणार महविजेता ? कोणाला मिळणार मानाची कट्यार हे कळेलच.
यानिमित्ताने बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) - अनिकेत जोशी म्हणाले, "सूर नवा..." च्या मागील पर्वांचा प्रवास बघितला तर लक्षात येईल या कार्यक्रमाने नेहेमीच नवनवीन प्रयोग केले आहेत. मग ती पर्वाची थीम असो वा काही विशेष भाग असो. प्रेक्षकांना या वैविध्यतेने कार्यक्रमाशी बांधून ठेवले. इतकेच नव्हे तर नवा प्रेक्षक कार्यक्रमाशी जोडत गेला ज्याचं फायदा वाहिनीला देखील झाला आहे. या पर्वात आजची तरुण पिढी जुन्या सुप्रसिध्द मराठी गाण्यांचं रिप्राइज्ड version घेऊन आपल्या भेटीस येणार आहेत. हे स्पर्धकांसमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. पण, यातूनच आपल्याला आजच्या तरुणाईच्या आवाजाचा शोध लागेल यात शंका नाही. आमच्या या प्रयत्नात प्रेक्षक देखील आमची साथ देतील अशी आम्ही अशा करतो."
कार्यक्रमाविषयी बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - विराज राजे म्हणाले, "सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा गेल्या सहा वर्षांत त्याचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. ज्यांना संगीताची गोडी आहे, उत्तम जाण आहे असे रसिक प्रेक्षक या कार्यक्रमास जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नवं पर्व आणताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो कारण कुठेतरी आम्ही त्याच्या अपेक्षांना बांधील आहोत. "सूर नवा..." चे हे नवे पर्व आमच्यासाठी खास आहे कारण यामध्ये महाराष्ट्रातील असंख्य होतकरू, ज्यांना आजवर टॅलेंट असूनही संधी मिळाली नाही अश्या तरुण पिढीचे असणार आहे. आजवर “सूर नवा…” ने अनेक गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हे पर्व आजचे महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली गाजवतील यात शंका नाही. प्रत्येक पर्वाचा एक प्रवास असतो या पर्वाच्या देखील सुरेल प्रवासाचे साक्षीदार व्हायला आमच्यासोबतच अख्खा महाराष्ट्र उत्सुक आहे याची आम्हांला खात्री आहे. या पर्वाला देखील रसिक प्रेक्षक वर्गाचे भरभरून प्रेम मिळेल अशी आशा आहे".
या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांची लाडकी रसिका सुनील करणार आहे, यानिमित्ताने बोलताना ती म्हणाली, "मी खूपच उत्सुक आहे की, यावर्षी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. कारण, माझ्यासोबतच आमच्या घरातील सगळे हा कार्यक्रम आवर्जून बघतो. सूर नवा ध्यास नवा वेगळ्या ढंगात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे त्यामुळे सूत्रसंचालन करण्यासाठी एक वेगळीच उत्सुकता आहे. यासाठी काही विशेष तयारी केली नाहीये, मी जशी आहे तशीच तुम्हां सगळ्यांसमोर येणार आहे. तेव्हा मला खात्री आहे तुमचं प्रेम मला पाहिल्यासारखंच मिळेल".
तेव्हा आपण सगळे आनंद घेऊया या सुरेल संगीत मैफिलीचा. नक्की बघा "सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा" ७ ऑक्टोबरपासून शनि - रवि रात्री ९. ०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment