कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले, कर्णबधिर व्यक्तीला ऐकण्याची क्षमता, जगण्याची नवी आशा आणि उपजीविका परत मिळाली
नवी मुंबई, 13 जून 2024: ४४ वर्षांचे राजेंद्र जैन गेली सात वर्षे बहिरेपणाने त्रस्त होते, पण आता त्यांना ऐकण्याची क्षमता परत मिळाली आणि त्यामुळे उपजीविका देखील परत मिळाल्याने जीवनात नवा आनंद, नवी आशा निर्माण झाली आहे. ही किमया घडून आली कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईमध्ये यशस्वीपणे करण्यात आलेल्या, जीवन बदलवून टाकणाऱ्या कोक्लियर इम्प्लान्ट सर्जरीमुळे श्री जैन यांना आता आवाज, संगीत पुन्हा ऐकू येऊ लागले आहेत, जीवन परिपूर्ण होण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
सात वर्षांपूर्वी श्री जैन यांनी ट्युबरक्युलोसिससाठी घेतलेल्या औषधांचा विपरीत परिणाम होऊन त्यांची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे लोप पावली, तेव्हापासून ते बहिरेपणाने त्रस्त होते. अनेक वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये वेगवेगळे उपचार करून घेतले, हीयरिंग एड्स वापरून पाहिली पण त्यांची ऐकण्याची क्षमता अधिकाधिक कमी होत गेली आणि पूर्ण बहिरेपणा आला. यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन उध्वस्त झाले. बहिरेपणामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. अगदी जवळच्या लोकांसोबत बोलणे देखील त्यांच्यासाठी कठीण होऊन बसले, त्यामुळे ते एकलकोंडे झाले, जीवन अतीव निराशेने काळवंडून गेले.
श्री राजेंद्र जैन सांगतात, "तो माझ्या आयुष्यातील अतिशय दुर्दैवी काळ होता. मी माझे सर्वस्व गमावून बसलो होतो, मला कोणाशी बोलता येत नव्हते, माझे स्वातंत्र्य, आजूबाजूच्या जगासोबतचे संबंध हिरावून घेतल्यासारखे झाले होते. माझी नोकरी सुटली आणि मी अधिकच हतबल झालो व माझ्या कुटुंबासाठी एक ओझे बनलो."
श्री जैन यांना कोक्लियर इम्प्लान्ट्सबद्दल माहिती होती. गंभीर बहिरेपणा आलेल्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ही इलेक्ट्रॉनिक साधने पुन्हा मिळवून देऊ शकतात, त्यामुळे श्री जैन यांना त्यामध्ये आशेचा किरण दिसला. पण ही संपूर्ण प्रक्रिया, प्रत्यारोपण आणि त्याचा वैद्यकीय खर्च या सर्व बाबी त्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या.
जानेवारी २०२४ मध्ये श्री जैन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये ईएनटी डिपार्टमेंटमध्ये आले. तिथे कन्सल्टिंग ईएनटी सर्जन आणि कोक्लियर इम्प्लान्ट्समधील विशेषज्ञ ओटोरहिनोलारिंजोलॉजिस्ट डॉ वरुण दवे यांनी त्यांना तपासले व खात्री करून घेतली की ही सर्जरी त्यांच्यावर केली जाऊ शकते.
कोक्लियर इम्प्लान्टमुळे श्री जैन यांच्या जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडून येऊ शकते हे ओळखून डॉ दवे यांनी या सर्जरीसाठी निधी जमा करण्याचे ठरवले. अंतर्गत संसाधनांचा उपयोग करून घेऊन सर्जरीचा बहुतांश खर्च करण्यात आला, काही रक्कम बाहेरून दान स्वरूपात मिळाली.
या औदार्याने भारावून गेलेले श्री राजेंद्र जैन यांनी सांगितले, "जेव्हा मला समजले की हॉस्पिटल माझी सर्जरी स्पॉन्सर करणार आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटले की माझ्या आयुष्यात जादू घडून येत आहे. ते मला संधी देऊ पाहत होते पुन्हा ऐकू शकण्याची, माझ्या कुटुंबासोबत पुन्हा जोडले जाण्याची, पुन्हा काम करू शकण्याची आणि पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची."
राइनोप्लास्टी व कोक्लियर इम्प्लान्ट्समधील अनुभवी आणि ज्यांनी युकेमधील प्रतिष्ठित यॉर्कशायर ऑडिटरी इम्प्लान्ट सेंटर व ब्रॅडफोर्ड रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रशिक्षण दिले आहे असे डॉ दवे यांनी ९ जानेवारी २०२४ रोजी सर्जरी केली. डॉ समीर भोबे व डॉ श्रुती डेचम्मा यांनी त्यांना साहाय्य केले. इंट्रा-ऑपरेटिव्ह तपासण्यांमध्ये दिसून आले की इम्प्लान्ट योग्य प्रकारे काम करत आहे. सर्जरीनांतर तीन आठवड्यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी इम्प्लान्ट ऍक्टिव्हेट करण्यात आले. आणि अखेरीस सात वर्षांनंतर श्री राजेंद्र जैन यांनी आवाज ऐकण्याचा अतिशय भावुक क्षण अनुभवला.
श्री जैन भारावून गेले होते. ते म्हणाले, "तो क्षण निःशब्द करणारा होता. मला पुन्हा ऐकू येऊ लागले, जणू काही माझे जग पुन्हा जिवंत झाले. माझ्या पत्नीने मला विचारले की मला कसे वाटते आहे, ते मी ऐकले आणि माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले. माझी आवडती बॉलिवूड गाणी ऐकली तेव्हा मला खूप आनंद झाला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई, डॉ दवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, ज्यांनी या सर्जरीसाठी निधी दान केला त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो."
डॉ वरुण दवे म्हणाले, " कोक्लियर इम्प्लान्ट्स ही फक्त वैद्यकीय साधने नाहीत, ती रुग्णांना त्यांचे जीवन आणि त्यांची स्वप्ने पुन्हा मिळवण्यासाठी सक्षम बनवतात. श्री जैन यांची केस वैद्यकशास्त्र आणि औदार्य यांचा मिलाप घडून आल्यास जी शक्ती निर्माण होते त्याचे एक उत्तम उदाहरण आहे."
इम्प्लान्टसोबत श्री राजेंद्र जैन यांना जास्तीत जास्त चांगले ऐकता यावे यासाठी त्यांना दोन महिन्यांच्या एका सर्वसमावेशक रिहॅबिलिटेशन प्रोग्राममध्ये सहभागी करवून घेण्यात आले. त्यामुळे त्यांना शांत तसेच भरपूर गोंगाट असलेल्या वातावरणात देखील ऐकू येण्याची क्षमता परत मिळवता आली, त्यांना नोकरी
No comments:
Post a Comment