एण्ड टीव्हीवरील मालिका 'भीमा'मध्ये प्रतिभावान कलाकार असतील, जसे 'भीमा'च्या भूमिकेत तेजस्विनी सिंग, भीमाची आई 'धनिया'च्या भूमिकेत स्मिता साबळे, भीमाचे वडिल 'मेवा'च्या भूमिकेत अमित भारद्वाज, 'कैलाशा बुआ'च्या भूमिकेत नीता महिंद्रा आणि तिची दोन मुले, 'कलिका सिंग'च्या भूमिकेत मयंक मिश्रा व 'विश्वंबर सिंग'च्या भूमिकेत विक्रम द्विवेदी. त्रिपुरारी यादव भीमाचे काका 'गया'च्या भूमिकेत दिसतील आणि नेहा शर्मा त्याची पत्नी 'फलमतिया'च्या भूमिकेत दिसेल. या मालिकेची निर्मिती राज खत्री प्रोडक्शन्सने केली आणि मालिका सुरू होत आहे ६ ऑगस्ट २०२४ पासून रात्री ८.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर.
राष्ट्रीय, ०१ ऑगस्ट २०२४: १९८०च्या दशकावर आधारित आणि राज खत्री प्रोडक्शन्स निर्मित एण्ड टीव्हीवरील नवीन मालिका 'भीमा' मागासवर्गीय समाजातील तरूण मुलगी 'भीमा'च्या जीवनगाथेला सादर करते. मालिकेचे कथानक सामाजिक ड्रामा आहे, जे या तरूण मुलीचे प्रयत्न आणि समान अधिकार मिळवण्याप्रती तिच्या प्रवासाला प्रकाशझोतात आणते. प्रेक्षकांना तिचा धाडसी प्रवास पाहायला मिळेल, जेथे ती तिचे कुटुंब, समाज आणि आर्थिक स्थितींमुळे उद्भवलेल्या संकटांशी सामना करते. अनेक अन्याय व भेदभावांचा सामना करत ती नीडरपणे या अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे कायदे व आदर्श कायम ठेवण्याचा भीमाच्या संकल्पामधून आव्हानांना न जुमानता तिची अविरत कटिबद्धता दिसून येते. अगदी कमी वयामध्ये ती या मिशनप्रती स्वत:ला प्रामाणिकपणे झोकून देते. पण, तिच्या या प्रयत्नांमुळे घाबरून गेलेला समाजातील उच्चभ्रू वर्ग तिच्या प्रयत्नांना मोडून काढण्यासाठी एकत्र येतो. अडथळ्यांसोबत संघर्ष गंभीर होत असताना देखील भीमाचा दृढनिश्चय कायम राहतो.
या मालिकेबाबत सांगताना एण्ड टीव्हीचे व्यवसाय प्रमुख विष्णू शंकर म्हणाले, ''आमच्या मालिका 'एक महानायक - डॉ. बी. आर. आम्बेडकर' आणि 'अटल'ला मिळालेल्या भव्य यशामधून आशा व प्रतिकाराच्या कथा प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसून येते. आमची नवीन मालिका 'भीमा' तरूण मुलगी भीमाच्या प्रवासाला सादर करण्यासोबत समान अधिकार मिळवण्यासाठी तिच्या लढ्याला, तिला सामना करावी लागणारी आव्हाने व संकट आणि मान्यता व सामाजिक परिवर्तनाप्रती तिच्या महत्त्वाकांक्षांना दाखवते. मालिकेचे कथानक आशा, निर्धार व परिवर्तनाच्या वैश्विक थीम्सना दाखवत सामाजिक अडथळ्यांवर मात करण्याच्या कथेला सादर करेल. भीमाची आव्हाने व विजय प्रेक्षकांशी संलग्न होतील, ज्यामुळे तिचा प्रवास प्रेरणादायी व पथदर्शक ठरेल. ही मालिका प्रबळ दृष्टीकोनाला सादर करेल, ज्याद्वारे प्रेक्षक त्यांची मूल्ये व विश्वासांचा शोध घेऊ शकतात, ज्यामुळे हे सर्वसमावेशक व विचारशील कथानक आहे.''
राज खत्री प्रोडक्शन्सचे निर्माता राज खत्री म्हणाले, '''भीमा' दृढनिश्चय, निर्धार व महत्त्वाकांक्षांची लक्षवेधक कथा आहे. या मालिकेमध्ये भावना व सर्वोत्तम प्रॉडक्शनचे परिपूर्ण मिश्रण आहे, जे टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या दर्जेदार कन्टेन्टप्रती वाढत्या मागणीची पूर्तता करते. मी सतत लक्षवेधक कथानक वितरित करण्यासाठी आणि आमच्या मालिकेला देशभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याकरिता मंच देण्यासाठी एण्ड टीव्हीचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. 'भीमा'चे कथानक प्रेरित करण्याचा, विचारशील अनुभव देण्याचा प्रयत्न करते आणि सहानुभूती व सामंजस्यपणाला चालना देण्यासाठी कथानकाची क्षमता अधिक दृढ करते.''
मालिका 'भीमा'च्या लेखिका शांती भूषण म्हणाल्या, ''उत्तर प्रदेशमधील शांतमय गावातील १९८० च्या दशकांमध्ये स्थित सामाजिक ड्रामा कलात्मकतेसह रचण्यात आला आहे, जो प्रेक्षकांशी संलग्न होणाऱ्या युगाला सादर करेल. प्रत्येक पात्र बारकाईने तयार करण्यात आले आहे, ज्यामधून प्रत्येक सीनशी जुडले जात असण्याची खात्री घेण्यात आली आहे. भीमाची भूमिका सर्वांना जागरूक करण्यास आणि सामाजिक ड्रामाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे.''
मालिका 'भीमा'मधील शीर्षक भूमिकेबाबत सांगताना तेजस्विनी सिंग म्हणाली, ''भीमा साहसी असून शिक्षण घेण्याचा निर्धार करते. तिचा अनेक आव्हानांचा सामना केल्यानंतर देखील अधिकारासाठी खंबीरपणे उभे राहण्यावर विश्वास आहे. ही प्रेरणादायी व प्रबळ भूमिका आहे आणि मला ही शीर्षक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे. मी आशा करते की, आम्ही मालिकेसाठी शूटिंग करताना केलेल्या धमालीप्रमाणे प्रेक्षक देखील आमची मालिका पाहण्याचा आनंद घेतील.'' भीमाची आई धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्हणाल्या, ''मालिका 'भीमा'चे लक्षवेधक कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. कलाकार म्हणून आम्ही अर्थपूर्ण असलेल्या आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. धनिया काळजी घेणारी आई आहे, जी तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवते. तिला शिक्षणाचे महत्त्व माहित आहे आणि भीमाच्या शिक्षणासाठीच्या अधिकाराला पाठिंबा देते.'' भीमाचे वडिल मेवाची भूमिका साकारण्याबाबत अमित कुमार म्हणाले, ''मेवा साधा माणूस आहे, जो सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रार्थना करतो आणि नेहमी लोकांना मदत करतो. पण, अन्यायाचा त्याच्यावर परिणाम झाला तरी त्याविरोधात आवाज न उठवण्याच्या त्याच्या अक्षमतेमध्ये त्याची कमजोरी आहे. मेवाची प्रबळ भूमिका आणि मालिका 'भीमा'चे लक्षवेधक कथानक यामुळे मी मालिकेमध्ये काम करण्यास त्वरित होकार दिला.''
पहा मालिका 'भीमा' ६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment