Friday, 9 August 2024

वडील आणि लेकीची जोडी, अनिल व सोनम कपूर मिळून करणार जॉनसन्स बेबीचे "प्रोटेक्शन* का प्रॉमिस पहले दिन से"


मुंबई9 ऑगस्ट२०२४:  बाळांच्या त्वचेची देखभाल करण्यासाठी विश्वसनीय ब्रँडजॉनसन्स बेबीने आपले सर्वात नवे कॅम्पेन सुरु केले आहेज्यामध्ये बॉलिवूडचे नामवंत अभिनेता अनिल कपूर व त्यांची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. जॉनसन्स बेबीच्या नवीन जाहिरात फिल्ममध्ये बॉलिवूडची ही सुप्रसिद्ध वडील व लेकीची जोडी हलकेफुलके हास्यविनोद करताना दिसेल. या फिल्मची संकल्पना डीडीबी मुद्रा यांची आहे. फक्त 'बाळासाठी सुरक्षित सामग्रीवापरून तयार केलेल्या उत्पादनांसोबत पहिल्या दिवसापासून बाळाच्या नाजूक त्वचेची सुरक्षा करण्याचे ब्रँडचे वचन यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.

जॉनसन्स बेबीच्या नवीन फिल्ममध्ये वडील आणि लेक अनिल व सोनम कपूर आपल्या वास्तविक जीवनातील भूमिकांमध्येच दिसत आहेतसुपर हिट सिनेमा मि. इंडिया (१९८७) मध्ये अनिल कपूर यांनी केलेल्या भूमिकेचाही मजेशीर उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. फिल्मची सुरुवात होते तेव्हा सोनम आपल्या बाळाला जॉनसन्स बेबी सोपने आंघोळ घालत असते. बाळाचे आजोबाअनिल कपूर यांना बाळाच्या नाजूक त्वचेविषयी काळजी वाटत असते आणि ते सोनमला सांगतात की अंघोळीदरम्यान बाळाच्या त्वचेतील मॉइश्चर कमी होऊ शकते. 'प्रोटेक्शन* पहले दिन सेअतिशय आवश्यक आहे. वडिलांची चिंता दूर करण्यासाठी सोनम मस्करी करत आपल्या बाळाशी बोलते - "मॉइश्चर गायब हो जाएगामि इंडिया है क्या?" यावर बाळ खुश होऊन हसू लागते. पुढे सोनम जॉनसन्स बेबी सोपची वैशिष्ट्ये सांगते कीहा साबण नैसर्गिक पद्धतीने मिळवलेल्या ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई पासून खास फॉर्म्युलेट करण्यात आला आहे. त्याचा जेंटल फॉर्म्युला बाळाच्या त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा आणि त्वचेवरील संरक्षक आवरणाचे संरक्षण करण्यात मदत करतो आणि म्हणूनच जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळांसाठी जॉनसन्स बेबी सोप 'परफेक्ट चॉईसआहे.

केनव्यूचे बिझनेस युनिट हेड - इसेन्शियल हेल्थ आणि व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंगश्री मनोज गाडगीळ यांनी सांगितले, "गेल्या अनेक वर्षांपासून जॉनसन्स बेबी ब्रँड आईबाबांचा विश्वसनीय साथीदार आहेजो बाळांना सर्वोत्तम देखभाल देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा एकत्रित सहभाग असलेले आमचे नवे जाहिरात कॅम्पेन सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळाची सुरक्षा करण्यात मदत करण्याची आमच्या ब्रँडच्या बांधिलकीला अनुरूप असे हे कॅम्पेन आहे. यामध्ये आम्ही अधोरेखित करत आहोत की आम्ही अशी उत्पादने देतो ज्यांना बाळाच्या त्वचेचे पहिल्या दिवसापासून संरक्षण करण्यात मदत करण्यासाठीफक्त बाळासाठी सुरक्षितसौम्य सामग्रीपासून तयार करण्यात आले आहे. आम्हाला खात्री आहे कीही नवी फिल्म प्रत्येक आईला खूप आवडेल."

जॉनसन्स बेबीच्या टीव्हीसीमध्ये काम करण्याच्या अनुभवाविषयी अभिनेता अनिल कपूर यांनी सांगितले, "जॉनसन्स बेबी एक आयकॉनिक ब्रँड आहेअसा ब्रँड ज्याने आमच्यासारख्या अनेक आईबाबांच्या पालकत्वाच्या वाटचालीत साथ दिली आहे. जेव्हा आमची मुले जन्मली तेव्हा त्यांना पहिली अंघोळ घालतानामालिश करताना आणि इतर अनेक बाबतीत सुनीता आणि मी जॉनसन्सवर विश्वास ठेवला. मला खूप आनंद होत आहे कीआज माझी लेक सोनमसोबत जॉनसन्सच्या सर्वात नवीन कॅम्पेनमध्ये मी सहभागी झालो आहे आणि म्हणूनच हे कॅम्पेन माझ्यासाठी अजूनच संस्मरणीय व विशेष आहे. वडील आणि आता आजोबा म्हणून मी समजू शकतो कीबाळाला पहिल्या दिवसापासून सर्वात चांगली देखभाल आणि सुरक्षा देण्यासाठी फक्त विश्वसनीय ब्रँड निवडणे महत्त्वाचे आहे."

सोनम कपूरने सांगितले, "जॉनसन्स बेबी एक असा ब्रँड आहे ज्याच्यासोबत आम्ही वाढलो आहोतहा ब्रँड माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या करतो. आज मी एक आई आहे आणि मी असे मानते कीमाझ्या बाळाच्या त्वचेचे संरक्षण करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. मी फक्त असे ब्रँड निवडते जे बाळासाठी सुरक्षित आहेतज्यांना फक्त बाळासाठी सुरक्षित सामग्रीपासून बनवण्यात आले आहेजे पहिल्या दिवसापासून बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्यात मदत करतात. जॉनसन्स बेबीच्या कॅम्पेनमध्ये माझ्या पप्पांसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. ही भागीदारी मला खूप जवळची आहे कारण यामध्ये प्रत्येक आईवडिलांचे बाळाप्रती प्रेम आणि समर्पण दिसून येते."

डीडीबी मुद्राचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर हर्षदा मेनन आणि सिद्धेश खटावकर यांनी सांगितले, "जेव्हा घरात बाळ जन्माला येते तेव्हा सगळीकडे आनंदीआनंद पसरतो. त्यामुळेच ही सीरिज आमच्यासाठी कधीच इतर कोणत्याही सामान्य जाहिरातीप्रमाणे नव्हती. काळजी आणि देखभाल करणारे आजोबाप्रेम करणारी आई व लहानगेनाजूक बाळ यांच्यातील प्रेम व हास्यविनोदाचे अनेक किस्से असतात आणि जॉनसन्स बेबी त्या सर्वांचा एक महत्त्वाचा भाग आहे."

बहुप्रतीक्षित "प्रोटेक्शन* का प्रॉमिसपहले दिन सेकॅम्पेन सर्व प्रमुख टीव्ही चॅनेल्सडिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया नेटवर्क्सवर चालवले जात आहे. १ हजारांहून जास्त इन्फ्ल्यूएंसर मॉम सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नवीन कॅम्पेनसह लाईव्ह जाऊन हे प्रॉमिस करतील.

टीव्हीसी लिंक:

हिंदी: https://www.youtube.com/watch?v=elyPpR-1RG8

No comments:

Post a Comment