Wednesday, 19 March 2025

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने पीडियाट्रिक ईएनटीमध्ये नवा टप्पा गाठला, दुर्मिळ आनुवंशिक विकाराने ग्रस्त ११ महिन्यांच्या बाळावर केले कॉक्लियर इम्प्लान्ट

• बॅरेटसर विंटर सिंड्रोम हा एक दुर्मिळ विकार आहे, जगभरात याच्या १०० हुन कमी केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. 
• सेन्सरीन्यूरल बहिरेपण हे बॅरेटसर विंटर सिंड्रोमचे एक विशेष लक्षण असते आणि कॉक्लियर इम्प्लान्टमुळे यावर उपचार केले जाऊन बाळाला श्रवण क्षमता पुन्हा मिळवून देईल.
19 मार्च 2025, नवी मुंबई:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने ११ महिन्यांच्या बळावर बायलॅटरल कॉक्लियर इम्प्लान्ट यशस्वीपणे करून पीडियाट्रिक ईएनटी देखभालीमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या बाळाला बॅरेटसर विंटर सेरिब्रोफ्रंटोफेशियल सिंड्रोम (BWCS) झालेला होता. हा एक दुर्मिळ आनुवंशिक विकार आहे, जगभरात याच्या १०० हुन कमी केसेस आढळून आल्या आहेत. सिंड्रोमच्या न्यूरॉलॉजिकल आणि शारीरिक लक्षणांमध्ये हृदय दोष, मेंदूमध्ये असामान्यत्व, सेन्सरीन्यूरल बहिरेपण आणि इतर विसंगतींचा समावेश असतो. कॉक्लियर इम्प्लान्टसह प्रारंभिक उपचार लहान मुलांमध्ये बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या क्षमतेचा विकास आणि एकंदरीत जीवन गुणवत्ता वाढवतात. बॅरेटसर विंटर सिंड्रोमसारखा दुर्मिळ विकार असलेल्या बाळासाठी कमी वयामध्ये ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळवून दिल्याने बोलण्याच्या क्षमतेचा आणि कम्युनिकेशनचा विकास वेळीच होण्यात मदत मिळते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईचे कन्सल्टिंग ईएनटी सर्जन आणि ओटोऱ्हीनोलैरिंजोलॉजिस्ट डॉ वरुण दवे यांनी सांगितले, "बॅरेटसर विंटर सेरिब्रोफ्रंटोफेशियल सिंड्रोम एक दुर्मिळ आणि गुंतागुंतीची स्थिती आहे. चेहऱ्याची विकृती, विकासामध्ये विलंब, फिट येणे आणि इतर सिस्टमिक गुंतागुंत ही याची लक्षणे आहेत. त्यासोबतच इतर अनेक न्यूरॉलॉजिकल व शारीरिक विसंगती असतात, त्यामुळे सर्जिकल आणि ऍनेस्थेटिक प्रक्रियांमध्ये अडचणी वाढतात. त्यामुळे आम्हाला एक व्यक्तिगत दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक होते. प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूची काळजीपूर्वक योजना केली गेली आणि या रुग्णाच्या खास गरजा पूर्ण करण्यासाठी ती योजना बारकाईने अंमलात आणली गेली. ऍनेस्थेशियापासून इलेक्ट्रोड प्लेसमेंटपर्यंत प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलले गेले."
बाळाची स्थिती अशी होती की, सर्जरी करणे गुंतागुंतीचे झाले असते, सतत लक्ष ठेवून संभाव्य गुंतागुंत दूर करणे आवश्यक होते. या प्रक्रियेमध्ये सर्व इलेक्ट्रोडचे फंक्शनिंग योग्य चालत आहे याचे रिअल-टाइम कन्फर्मेशन करून बायलॅटरल कॉक्लियर इम्प्लान्ट केले गेले. कॉक्लियरच्या स्मार्ट एनएव्ही तंत्रज्ञानाचा (Smart Nav technology) उपयोग इंट्रा-ऑपमध्ये केला गेला. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे इम्प्लान्टच्या फंक्शनिंगचे रिअल-टाइम अपडेट देते. बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेचा संभाव्य विकास जास्तीत जास्त व्हावा यासाठी डिव्हाईस योग्य जागी बसवणे आवश्यक होते.
डॉ वरुण दवे यांनी सांगितले, "सर्जरी योजनेनुसार पार पडली आणि प्रक्रियेदरम्यान कॉक्लियर इम्प्लान्ट कार्यक्षम असल्याची खात्री करण्यात आली. बाळाची तब्येत वेगाने सुधारली आणि सर्जरीनंतर २४ तासांहून कमी वेळात त्याला घरी पाठवण्यात आले. वेगाने झालेली रिकव्हरी हॉस्पिटलचे कुशल देखभाल प्रोटोकॉल आणि संपूर्ण मेडिकल टीमच्या बांधिलकीचा परिणाम आहे. बाळाला हॉस्पिटलमधून लवकर घरी पाठवून दिल्याने कुटुंबावरील तणाव कमी झाला आणि बाळाला त्याच्यासाठी आरामदायक वातावरणामध्ये बरे होण्याची संधी मिळाली."
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ शशिकांत पवार यांनी सांगितले, "ऐकण्याची क्षमता प्रत्येक मुलाकडे असलीच पाहिजे. ही केस रुग्णकेंद्रित देखभाल प्रदान करण्याप्रती आमची बांधिलकी दर्शवते, आमची ही बांधिलकी सर्वात आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यामध्ये उपयुक्त ठरली आहे. हे यश नावीन्य आणि दर्जेदार देखभालीप्रती आमच्या टीमची वचनबद्धता दर्शवते. या केसमधून समजून येते की, काळजीपूर्वक केलेली योजना आणि सहयोग यामुळे सर्वात गुंतागुंतीच्या मेडिकल केसेसचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले जाऊ शकते. आम्हाला अपेक्षा आहे की, दुर्मिळ परिस्थतीचा मुकाबला करत असलेल्या बाळांना, मुलांना सहायता प्रदान करणे आम्ही यापुढे देखील सुरु ठेवू."

No comments:

Post a Comment