·
ग्राहक अनुभव मुळाशी ठेवून डिझाईन केलेला हा पेंट स्टुडिओ या राज्यातील अशा अनोख्या स्वरूपाचा पहिलाच कंपनीच्या मालकीचा आणि कंपनीद्वारा संचालित स्टुडिओ आहे
· बिर्ला ओपस पेंट स्टुडिओ इनोव्हेशन आणि पर्सनलाईझेशनची सांगड घालून गृह सजावटीच्या कल्पना साकार करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आकर्षक जागा प्रदान करतो
भारत, 25 मार्च 2025, मुंबई: आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम उद्योगांतर्गत ग्रासिम इंडस्ट्रीजचा एक भाग असलेल्या बिर्ला ओपस पेंट्सने आज मुंबई आणि नवी मुंबई येथे नवीन बिर्ला ओपस पेंट स्टुडिओ (कंपनीच्या मालकीचे आणि कंपनीद्वारा संचालित स्टोअर) सुरू केल्याचे जाहीर केले. गुरुग्राम आणि लखनौ पाठोपाठ ब्रॅंडने केलेला हा विस्तार इनोव्हेशन, प्रीमियम ऑफरिंग्ज आणि एक खराखुरा गुंतवून ठेवणारा ग्राहक अनुभव यांच्या माध्यमातून पेंट आणि डेकोर उद्योगात परिवर्तन आणण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची ग्वाही देतो. सदर लॉन्च म्हणजे बिर्ला ओपस पेंटच्या विकास धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि देशभरात आपली रिटेल उपस्थिती वाढविण्याचे त्याचे लक्ष्य आहे. अनुभवात्मक रिटेलवर फोकस ठेवून आगामी महिन्यांमध्ये बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, जयपूर, अहमदाबाद आणि सुरत येथे अतिरिक्त एक्सपिरीयन्स सेंटर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे.
हे दोन नवे बिर्ला ओपस पेंट स्टुडिओ पारंपरिक पेंट दुकानांच्या पलीकडे जाऊन सर्जनशीलता आणि प्रेरणा यांचे केंद्र म्हणून डिझाईन करण्यात आले आहेत. ही अशी एक्सपिरीयन्स सेंटर्स असतील, जी ग्राहकांना नवनवीन कल्पनांचा शोध घेण्यास तसेच अगदी जिवंत वातावरणात रंगांचा स्पर्श, फील आणि अनुभव घेण्यास मदत करतील. येथे शेडची निवड, टेक्श्चर्स आणि रंग लावण्याच्या टेकनिकच्या बाबतीत ग्राहकांना पर्सनलाईझ्ड गाईडकडून उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल. येथील प्रगत व्हिज्युअलाईझेशन टूल्स घरमालकांना आपण निवडलेला रंग रियल-लाइफ सेटिंगमध्ये कसा दिसेल याचा प्रीव्ह्यू देतील. पेंट स्टुडिओमध्ये परिपूर्ण डेकोर सोल्यूशनसाठी पेंट व्यतिरिक्त वॉलपेपर्स, डिझाईनर फिनिश आणि स्पेशलिटी कोटिंगचे पर्याय देखील बघायला मिळतील.
बिर्ला ओपस पेंट्सचे CEO श्री. रक्षित हरगवे म्हणाले, “या महिन्याच्या सुरुवातीस लॉन्च झालेल्या पेंट स्टुडिओजना मिळालेल्या प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन मुंबई आणि नवी मुंबईच्या ग्राहकांसाठी देखील हा अनोखा अनुभव घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरात राहणारे भारतीय रंगांचा अनुभव कसा घेतात याची व्याख्या नव्याने करण्याच्या दिशेने उचलेले हे एक निर्णायक पाऊल आहे. पेंट खरेदी करताना किंवा त्यासंबंधीच्या सेवा प्राप्त करताना भारतातील उपभोक्ते खुल्या दिलाने नवीन आणि अधिक गहन पर्याय शोधत असतात. त्यांच्या आचारणातील हा बदल हेरून बिर्ला ओपस पेंट्स तर्फे आम्ही सर्जनशील स्पेसिस निर्माण करत आहोत, जेणेकरून घरमालक आपल्या स्वतःच्या कहाणीचे स्वतः सर्जन करू शकतील.”
ते पुढे म्हणाले, “ही एक्सपिरीयन्स सेंटर्स म्हणजे उत्कृष्टता, इनोव्हेशन बाबतची आमची वचनबद्धता, गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करण्याची वृत्ती आणि प्रत्येक घराला एक वैयक्तिक स्पर्श असला पाहिजे या आमच्या आग्रहाचे प्रतीक आहे. आमची सर्वच्या सर्व 170+ उत्पादने आम्ही या सेंटरमध्ये ऑफर करत आहोत. पेंटिंग केवळ एक साधेसे काम नसून व्यक्तिगत कहाणी अभिव्यक्त करणाऱ्या जागेत रूपांतरित करणारी ती एक कला असली पाहिजे ही आमची दृष्टी आहे. हा विस्तार म्हणजे इनोव्हेशन, सुविधा आणि मुंबई व नवी मुंबईमधील प्रत्येक ग्राहकासाठी उत्कृष्टता सुनिश्चित करत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा डेकोरेटिव्ह पेंट ब्रॅंड बनण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
नुकत्याच उघडलेल्या एक्सपिरियंस स्टोअरचे तपशील:
वरळी स्टोअरचा पत्ता: बिर्ला ओपस पेंट्स स्टुडिओ, दुकान 2A, वासवानी चेंबर्स, डॉ. अॅनी बेसंट रोड, म्युनिसिपल कॉलनी, वरळी, मुंबई, महाराष्ट्र 400030
वाशी येथील दुकानाचा पत्ता: तळमजला, दुकान नंबर 14, सतरा प्लाझा, पाम बीच रोड, फेज 2, सेक्टर 19D, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र 400703
प्रत्येक बिर्ला ओपस पेंट स्टुडिओ हा आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझाईनर्ससाठीचे केंद्र म्हणून काम करतो, ज्यामध्ये त्यांच्यासाठी समर्पित जागा, संसाधने, नमुने आणि तज्ज्ञ सल्ला उपलब्ध असतो, ज्यामुळे व्यावसायिक सुलभतेने सहयोग आणि निर्मिती करू शकतात. ही एक्सपिरियंस सेंटर्स आमच्या पेंट क्राफ्ट पेंटिंग सेवेमार्फत पेंटिंग सेवा देखील देऊ करतील. प्रत्येक पेंट स्टुडिओमध्ये स्थानिक संस्कृती, वारसा आणि तेथील स्थापत्य कलेमधून प्रेरित काही खास रंग छटा देखील असतील.
No comments:
Post a Comment