Friday 7 June 2019

‘दि इन्सुलिन टी’ (चहा) पावडर बाजारात सादर

टाईप-२ मधुमेहाचे वाढते प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आयुरा ओरीजिन्सतर्फे नैसर्गिक उत्पादन
मुंबई, ७ जून २०१९:- टाइप-२ मधुमेहाच्या परिणामांवर मात करण्या‍साठी सर्व नैसर्गिक उत्पादने स्वदेशात विकसित करुन आयुरा ओरिजिन्स, गौर अॅग्रो प्रोडक्टस् प्रा.लि. या ब्रॅंडने ‘दि इन्सुलिन टी’ पावडर पहिल्यांदा बाजारात आणली. आयुरा ओरिजिन्स हा नैसर्गिक आरोग्य उत्पादनांची लागवड करणारा एक घरगुती ब्रॅंड असून मधुमेह, मूत्रपिंड व्याधी, हृदय रोग, पचनविषयक समस्या् आणि गाऊट / सांधेदुखी / संधिवातापासून होणाऱ्या विशिष्ट दीर्घकालीन आरोग्य् समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत आहे. पारंपारिक आयुर्वेद हा आयुरा ओरिजिन्सच्या सर्व उत्पादनांचा पाया आहे आणि आरोग्यासाठी पूरक आहार या स्वरूपात दैनंदिन वापराच्या दृष्टीने ही उत्पादने सज्ज केली जातात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या् अंदाजानुसार भारतात ७० दशलक्षाहून अधिक टाइप-२ मधुमेहाचे रुग्ण आहेत. गंभीर स्वरूपाची जीवनशैली आणि चुकीच्या अन्नपदार्थांचे सेवन करण्याच्या सवयींचा हा परिणाम आहे, जो वाढतच आहे आणि यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी असे बिरूद मिळाले आहे. चेन्नईला भारतातील मधुमेहाची राजधानी म्हणतात जिथे टाइप-२ मधुमेहाचे रुग्ण अधिक आहेत. टाइप-२ मधुमेहाचा उपचार करणे इतक्यापुरते हे मर्यादित नाही तर या रुग्णांना अंधत्व आणि मूत्रपिंडाच्या व्याधींनाही तोंड द्यावे लागते.
डॉ. मिकीता गांधी, मधुमेह प्रशिक्षक, मुख्य आहारतज्ञ, बीम्सा आणि निरॉन हॉस्पिटल टाइप-२ मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीच्या पर्यायी नियंत्रण पद्धतींचा वापर करण्याविषयी बोलताना म्ह‍णाल्या की, ‘' दैनंदिन सेवनासाठी सेंद्रिय अन्न खरेदी करणे कठीण असते. पण जेव्हां खबरदारी घेण्याची वेळ येते तेव्हा नैसर्गिकरित्या् उगवलेल्या‍ सेंद्रीय औषधी वनस्प‍ती  ची निवड करणे नेहमीच चांगले कारण त्यात खुप जास्त प्रमाणात उपचारासाठी पुरक गुणधर्म असतात. ही खबरदारी जेव्हा आपण दैनंदिन जीवनात घेऊ लागतो तेव्हा आधुनिक काळातल्या तणावग्रस्त दिवसांमधे पचनाशी संबंधित रोगांना प्रतिकार करण्यात मदत होते. यामुळे आजाराचे मूळ कारण दूर होऊन आपले संपूर्ण आरोग्य सुधारते. कोस्ट्स इग्नरस वनस्प‍ती तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तिच्या पानांमधे कोरोसॉलिक अॅसिड असते याला ग्लुसकोसॉल देखील म्हणतात जी मधुमेहाचा उपचार करुन इन्सुलिन मुक्त होण्यास प्रेरित करते. शिवाय स्वादुपिंडाची संवेदनशीलता वाढवते आणि रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज ‘मॉप अप’ करण्यास इन्सुलिनच्या पुरेशा उत्पादनाला प्रोत्साहन देते.’’
इन्सुलिन टी पावडर ही पूर्णपणे नैसर्गिक उत्पादन आहे आणि टाइप-२ मधुमेह रुग्णांना दैनंदिन सेवनासाठी सुरक्षित आहे. प्रतिबंधक उपाय म्ह्णून इन्सुालिन टी पावडरचा वापर करता येणार नाही. टाइप-२ मधुमेहाचे निदान झाल्या‍नंतरच याचे सेवन करता येईल. आयुरा ओरिजिन्सच्या सर्वेक्षणात नियमित ग्राहकांच्या् प्रतिक्रियेवरुन या उत्पादनाच्या ९० दिवसांच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेच्या पातळीत घट झाल्या्चे दिसते आणि ६ महिने याचे नियमित सेवन केल्यास हे प्रमाण सामान्य पातळीवर येते हे स्पष्ट झाले आहे. पहिले ६ महिने दिवसातून दोन कप त्या्नंतरचे ६ महिने दिवसातून एक कप अशा प्रमाणात याचे सेवन करता येते. नॅशनल इन्टीट्यूट ऑफ हेल्थ आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे निधी पुरवठा करण्यात आलेल्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेदा रिसर्चतर्फे प्रकाशित अभ्यासातही असे परिणाम दिसून आले आहेत.
मनु गोर, संचालक, गोर अॅग्रो प्रोडक्टस् प्रा.लि. यांनी सांगितले की, ‘’कोस्टास इग्नरस इन्सुीलिन टी हे उत्पादन प्रक्रियेअधीन आहे, आम्हा्ला त्याची संपूर्ण कार्यक्षमता जाणून घ्यायची आहे आणि म्हणूनच आम्ही वैयक्तिकरित्या टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांवर लक्ष देत आहोत. याचे खुप प्रभावी परिणाम दिसून येत आहेत. याच्या सेवनामुळे रक्तातील सारखेच्या प्रमाणात सतत घट होत आहे आणि सातत्या्ने त्यावर दिर्घकाळ नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करत एक वर्षभर या उत्पादनाचे सेवन करत निरीक्षण केले असता रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर झाल्याचे तसेच मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात ते योग्य प्रमाणात टिकून राहिल्याचे दिसून आले आहे.’’
दक्षिण भारतातील कोडाईकॅनलच्या पायथ्याशी प्राचीन नैसर्गिक पद्धतीने कुठल्याही रसायनांचा वापर न करता इन्सुलिन टी पावडरचे उत्पायदन केले जाते. ही टी पावडर कोस्टूस इग्नरस वनस्पातीपासून बनवली जाते जी इन्सु‍लिन वनस्पती म्हणून ओळखली जाते. टाइप-२ मधुमेह रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी औषधी गुणधर्म यात असल्याचे सिद्ध झाले आहे. शरीर इन्सुीलिन मुक्त होऊन ही इन्सुलिन टी पावडर स्वादुपिंडांतील बीटा पेशींचे पुनरुत्पादन करण्यासाठी मदत करते.
कोस्टणस इग्नरस ही वनस्पती उष्णकटिबंधीय हवामानात वाढते आणि दक्षिण भारत, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह जगातल्या विविध भागात आढळते. या भागातील स्थानिक लोक ‘साखर नियंत्रण’ करण्यासाठी याचे ताजे पान खातात. शिवाय या वनस्पतीत आणि त्याच्या मुळात पारंपरिक आयुर्वेद औषधांचे गुणधर्म आहेत. रॉक गार्डन फार्म मध्ये इग्नुयस वनस्पतीची १५ वर्षांपासून जोपासना केली जाते.
आयुराच्या इतर उत्पादनांमध्ये ‘मॅंगो लिफ टी’ ही एक ग्रीन टी आहे, जो शरीरातल्या साखर आणि कार्बोहायड्रेटसमध्ये असणाऱ्या साखरेचे ग्लायकोजनमधे रुपांतर होण्याला प्रतिबंध करुन टाइप-२ मधुमेहावर नियंत्रणाचे काम करतो. टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांना दिवसाची सुरुवात एक कप कोमट पाण्यात प्राशन करता येईल. यात प्रतिबंधात्मक गुणधर्म असल्यामुळे टाइप-२ मधुमेहाचे रुग्ण नसणाऱ्यांनासुद्धा याचे सेवन करता येईल आणि ते सुद्धा निरोगी जीवनशैली प्राप्त करू शकतील. ‘मॅंगो लिफ टी’ चे आणखी अनेक फायदे आहेत ज्यात दम्यावरचे उपचार आणि कोलेस्ट्रॉल कमी करणे यांचा समावेश आहे. यात अॅंटीऑक्सीडंटस आणि पोषक तत्वे आहे, ज्या‍मुळे आरोग्याप्रती सजग असणाऱ्यांसाठी तो एक आदर्श ग्रीन टी आहे.
इन्सुलिन टी पावडर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे - https://www.ayuraorigins.com या संकेतस्थेळावर

No comments:

Post a Comment