मुंबई ७ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात आता निश्चितचपणे दोन वेगवेगळे ग्रुप झाले आहेत ! किचन मध्ये नेहा आणि किशोरीताई मध्ये बराच वाद झाला.भांडणा मध्ये नेहाचा आवाज बराच चढला त्याची नेहाने माफी देखील मागितली परंतु ती जे काही किशोरीताईना बोली त्या भावनेविषयी ती माफी मागणार नाही असे तिने सांगितले... ज्यालाच अनसरून किशोरीताई नेहाला म्हणाल्या या घरामध्ये नकारात्मकता पसरवू नकोस आणि डिव्हाइड अँड रूल करू नकोस. या सगळ्यावर परागचे म्हणणे आहे “खाण्यावरून या घरात राजकारण करू नका, नाहीतर आम्ही चार जणांच वेगळ करून घेऊ”. त्यावर नेहाचे म्हणणे पडले आम्ही कुठलेही राजकारण करत नाहीये... घरामध्ये जितकी माणस तितक्या प्रवृत्ती... एकाच म्हणण कधीच दुसऱ्याला पटत नाही... एका म्हणण्याचा दुसरा अर्थ काढण्यात माणूस पटाईत असतो... प्रत्येकजण दुसऱ्याच्या बोलण्याचा त्याला हवा तसा, त्याच्या सोयीने अर्थ काढतो आणि त्यावरूनच गैरसमज होतात... घराम्धील सदस्यांमध्ये वा, विवाद, भांडण, कुरघोडी पहिल्या दिवसापासून सुरूच होत्या पण आता घरामध्ये वेगळच राजकारण होत आहे, काय होईल पुढे ? हे बघणे रंजक असणार आहे.
परागने त्याचे म्हणणे इतर सदस्यांना देखील सांगितले. आम्ही चार जण आमचं वेगळं करून घेऊ... त्यावर सुरेखाताईच म्हणण आहे, एकाच घरामध्ये वेगळी चूल मांडायला नको,त्याने घरामध्ये भांडण होतील... पण या घरामध्ये भांडण होणार नाही याची जबाबदारी परागने घेतली आहे... परागचे हे बोलणे आणि हा उपाय सुरेखाताईना पटला नाही. त्यांनी बिग बॉसला सांगितले, याला घरातून बाहेर काढा... हा दोन चुली करायला लागला आहे, त्याने जर चार लोकांचा स्वयंपाक केला तर आम्ही जास्त लोक आहोत आम्ही कुठे करायचा स्वयंपाक... बघू आता काय होत ...
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment