मुंबई ११ जून, २०१९ : बिग बॉस दर आठवड्यामध्ये घरातील सदस्यांना नवनवीन टास्क देतात... त्यामुळे सदस्यांमध्ये नेहेमीच उत्सुकता असते आता बिग बॉस कुठला टास्क सोपवणार ... या आठवड्यामध्ये बिग बॉस घरातील सदस्यांवर शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत...
शाळा सुटली पाटी फुटली साप्ताहिक कार्य ...
जून महिना नुकताच सुरु झाला आहे... शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते... त्याच जुन्या आठवणींना आणि आपल्यात दडलेल्या लहान मुलाला, निरागसतेला उजाळा देण्यासाठी बिग बॉस हे कार्य घरातील सदस्यांवर सोपावणार आहेत... ज्यामध्ये एका टीम मधील सदस्य विद्यार्थी तर दुसऱ्या टीम मधील सदस्य शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत... प्रत्येक शिक्षकाला नेमून दिलेला विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिकवणे अपेक्षित आहे... ज्यामध्ये सुरेखा पुणेकर यांनी नृत्यकला, विणा जगताप हीने वाद विवाद शास्त्र आणि शिवने मराठी हे विषय विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत... बघुया सदस्य हा टास्क कसा पार पडतील ? कोणामध्ये होतील वाद तर कोण एन्जॉय करतील हा टास्क ?
काल बिग बॉस मराठीच्या घरात काय घडले ?
कालच्या भागामध्ये शिव आणि माधव मध्ये चांगलाच वाद रंगला... ज्यामध्ये शिवने माधवला बजावून सांगितले कि, तुझ डोक खूप चालत आहे पण, माझ्यासमोर नाही चालवायचे... तर दुसरीकडे पराग शिवला आता त्याला कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये जावे लागेल असं सांगताना दिसला... तर नेहा आणि अभिजीत बिचुकले मध्ये पुन्हा वाद झाला, ज्यामध्ये बिचुकले नेहावर चिडले. परागला अजूनही शिववर विश्वास नाही असे त्याने विणा आणि किशोरीला सांगितले, तर अभिजीत आणि शिवमध्ये देखील चर्चा सुरु होती, ज्यामध्ये अभिजीत शिवला सांगताना दिसला कि, त्याला परागवर विश्वास नाही... आता शिव कुठल्या गटामध्ये जाईल हे कळेलच... तर दुसरीकडे, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस मिठाईवाला हा नॉमिनेशन टास्क रंगला ज्यामध्ये घरातील सदस्यांनी किशोरी शहाणे, दिंगबर नाईक, नेहा शितोळे, पराग कान्हेरे यांना घरा बाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले... तर सर्वानुमते माधव देवचके आणि अभिजीत बिचुकले यांनी घरातील नियमाचे उल्लंघन केल्यामुळे या दोघांनाही नॉमिनेट केले...
या आठवड्यामध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाईल ? प्रेक्षकांची मते कोणाला वाचवतील ? हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment