Saturday 18 January 2020

भावेश पाटील यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे ‘रहस्य’

अलीकडच्या मराठी चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यामागचे अनेक चेहरे तरुण आहेत. सध्या मराठीत जे तरुण निर्माता  दिग्दर्शक येत आहेत ते नव्या तंत्रात नव्या शैलीत कलाकृती सादर करत आपली क्षमता दाखवून  देतायेत. असाच वेगळा प्रयत्न करीत भावेश पाटील या तरुणाने आगामी रहस्य या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
फिल्म मेकिंग आणि अॅनिमेशनचे शिक्षण घेतलेल्या भावेश यांना चित्रपटाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक लघुपटांची निर्मिती केल्यानंतर व्यावसायिक चित्रपटाचे दिग्दर्शन करावे या इच्छेतून त्यांनी रहस्य चित्रपटाच्या दिग्दर्शन व निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या या पहिल्या वहिल्या चित्रपटनिर्मितीच्या प्रवासाबद्दल भावेश सांगतात, ‘प्रत्येकाचा पहिला चित्रपट हा खूप ‘पर्सनल’ असतो. लघुपटनिर्मिती नंतरचा हा चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रयोग होताहेत. आमच्या चित्रपटातही तंत्राचा अविष्कार पहायला मिळणार आहे. आमचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास भावेश पाटील व्यक्त करतात. प्रत्येक व्यक्ती कधीतरी फ्रेशरच असते. त्यामुळे नव्यांना संधी देणंही तितकंच गरजेचं आहे. ‘रहस्य’ चित्रपटात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
रहस्यमय थरार आणि नास्तिकता यांची सांगड घालत रहस्य’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे. लकी बडगुजरस्वाती पाटीलऋतुजा सोनारस्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. गायक सुनिधी चौहानआदर्श शिंदेप्रेम कोतवालयामिनी चव्हाण या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी नरेंद्र भिडे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित व मंदार पंडित यांचे आहे. डॉ. माधुरी वडाळकरदिनेश पाटील चित्रपटाचे सहनिर्माते असून गिरीश सूर्यवंशी कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकरतर संकलन भावेश पाटील यांचे आहे. ऋतूध्वज देशपांडे यांनी चित्रपटाचे व्हीएफएक्स केले आहेत. निर्मिती व्यवस्थापक विजय माळी आहेत. डॉ. अजय फुटाणे या चित्रपटाचे वितरक आहेत.

No comments:

Post a Comment