Tuesday, 21 January 2020

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर ‘ठाकरे’ कलर्स मराठीवर ! रविवार २६ जानेवारी दु. १२ वा.

मुंबई २१ जानेवारी, २०२० : सायकल, आणि... डॉ. काशीनाथ घाणेकर, भाई – व्यक्ती की वल्ली – पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आणि कागर यांसारखे दर्जेदार आणि विविध विषयांवरील चित्रपट कलर्स मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीस आणले. कलर्स मराठी येत्या २६ जानेवारी दु. १२ वा. प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे मराठी मनावर अधिराज्य करणारे, मराठी माणसाला भुरळ घालणारे, व्यंगचित्रामधून आपले राजकीय मत मांडणारे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटठाकरे
संजय राऊत प्रस्तुतराऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपीवायकॉम१८ स्टुडिओज आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित 'ठाकरेया चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तर अभिनेत्री अमृता राव हीने माँसाहेब मीनाताई ठाकरेंची प्रमुख भूमिका साकारली आहेतअभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.
व्यवसाय प्रमुख - मराठी मनोरंजनवायाकॉम१८ - निखिल साने म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये अनेक थोर कर्तुत्ववान नेते होऊन गेले ज्यांचा इतिहासात घडलेल्या घटनांवर प्रभाव पडला आणि त्यामधीलच सर्वात महत्वाचे नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणूनच ठाकरे हा मराठी सिनेमाच्या इतिहासातील महत्वाचा बायोपिक आहेआम्ही आमचं भाग्य समजतो, की संजय राऊत सर आणि ठाकरे सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली”.
बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण कानी पडलं की, अंगामध्ये नवे चैतन्य संचारायचे त्यांच्या आवाजातील जरब प्रत्येक माणसाला महाराष्ट्रीय असल्याचा गर्व देऊन जायची... कलाप्रेमी, व्यासंगी, आपल्या तेजस्वी प्रतिभेने, मदतीस धावून जाणार्‍या बाळासाहेबांनी मराठीच नव्हे तर इतर प्रातियांचे अलोट प्रेम मिळवले. धगधगत्या, ज्वलंत अशा चरित्राचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर ठाकरे नक्की बघा येत्या २६ जानेवारीला दु. १२ वा. कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment