Photo captions:
Singapore Chess, Aditya Patil, Jan 2020: Mumbai lad Aditya Patil poses with the runner-up trophy
Singapore Chess, Vedant Karthik, Jan 2020: Mumbai lad Vedant Karthik who finished in third position poses with the runner-up trophy
Marathi report:
सिंगापूर येथील स्पर्धेत आदित्य, वेदांतला पदके
मुंबई, 6 जानेवारी : आदित्य पाटील व वेदांत कार्तिक या मुंबईच्या मुलांनी 36 व्या सिंगापूर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदकांची कमाई केली. ही स्पर्धा सिंगापूरच्या एक्स्पो सेंटर चांगी येथे पार पाडली.
आदित्य पाटील हा धिरुभाई अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून माजी आशियाई स्कूल गेम्स पदक विजेता आहे. त्याने नऊ वर्षाखालील गटात रौप्यपदक मिळवत चमक दाखवली. या गटातील सुवर्णपदक मलेशियाच्या ये हाओ लूंगने मिळवले. अशी माहिती एसएमसीएकडून देण्यात आली. आदित्य व ये हाओ लूंग यांनी 8 गेमनंतर 6.5 गुणांसह चमक दाखवली. आदित्यने अव्वल मानांकित मुथुकुमार मुकेशसोबत ड्रॉ खेळत त्याला मागे टाकले.
शिशुवन स्कूलचा वेदांत कार्तिक ( इंटरनॅशनल रेटिंग 1025) याने 8 गेम्समधून 6.5 गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळवले. वेदांतचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक आहे. त्याने सात वर्षाखालील गटात चमक दाखवली. हे मुले साऊथ मुंबई चेस अकॅडमीमध्ये सराव करतात. फिडे मास्टर बालाजी गुट्टुला याचे मार्गदर्शन त्यांना मिळते.
आदित्य व वेदांत हे यांमध्ये कौशल्य असून त्यांनी चांगला खेळ करत देशासाठी पदकांची कमाई केली असे प्रशिक्षक म्हणाले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 15 देशातील एकूण 663 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
No comments:
Post a Comment