झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय . अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. या कार्यक्रमात सुरवातीला १४ सेलिब्रिटी डान्सर स्पर्धक होत्या मात्र स्पर्धेच्या स्वरूपातील या कार्यक्रमात आता त्यातील केवळ ९ डान्सर स्पर्धक राहिल्या आहेत. युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम झी युवावर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता पहायला मिळतो. या कार्यक्रमाचे जज लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य हे आहेत . या कार्यक्रमात ओंकार शिंदे हा नृत्य दिग्दर्शक असून तो स्पर्धकांसाठी मेंटॉर सुद्धा आहे . सध्या तो या युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात प्रयोगावर प्रयोग करत असून नुकताच बॉलीवूड गाण्यावर मराठीमोळी लावणी प्रेक्षकांना पहायला मिळाली .
पूर्वा शिंदे म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील लागीर झालं जी या मालिकेतली जयडी ची भूमिका गाजवणारी ही अभिनेत्री सध्या युवा डान्सिंग क्वीन च्या व्यासपीठावर टोटल फॉर्मात आहे. सध्या प्रत्येक आठवड्याला ती बेस्ट डान्स साठी असलेला गोल्डन बझर परीक्षकांकडून मिळवत आहे . या आठवड्यात तिने बॉलिवूड मधील संजय दत्त आणि कोयना मित्रा वर चित्रित झालेलं , मुसाफिर चित्रपटातील साकी साकी या गाण्यावर चक्क मराठमोळी लावणी सादर केली. हे मूळ गाणं अतिशय हॉट अंदाजात सादर केलं गेलं आहे आणि पूर्वानेही ही लावणी सादर करताना कुठेही कमी दिसली नाही . तिचा पेहराव , तिचे आवभाव , ही लावणी सादर करतानाचा तिचा ऍटिट्यूड हा कमालीचा होता. एक मराठी मुलगी लावणी करताना किती सुंदर दिसू शकते हे याचा प्रत्तय प्रेक्षकांना नक्कीच आला असेल . हिंदी गाण्यावरील मराठी लावणी युवा डान्सिंग क्वीन च्या व्यासपीठावर एक नक्कीच वेगळा आणि उत्कृष्ट प्रयोग होता . अशा प्रकारचे वेगवगेळे परफॉर्मन्स पाहण्यासाठी बघत राहा झी युवा बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता फक्त झी युवावर .
No comments:
Post a Comment