थुकरट वाडीमध्ये रंगणार 'महाराष्ट्राचा सुपारीस्टार'
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.
येत्या आठवड्यात थुकरट वाडीत झी मराठीवर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आलेले २ नवीन कार्यक्रम - महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि अळीमिळी गुपचिळी यांची टीम येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता मकरंद देशपांडे, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अतुल परचुरे थुकरट वाडीत हजेरी लावणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमावर आधारित ‘महाराष्ट्राचा सुपारीस्टार’ हे एक विनोदी स्किट सादर केलं, ज्यात निलेश साबळे मकरंद देशपांडे आणि कुशल बद्रिके संजय जाधवची व्यक्तिरेखा साकारणार आहेत आणि त्यांना पाहून प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतील यात शंकाच नाही. या स्किटला संजय जाधव आणि मकरंद देशपांडे यांनी भरभरून दाद दिली. धमाल मस्तीने भरलेला हा भाग प्रेक्षक ३ आणि ४ फेब्रुवारीला पाहू शकतील.
No comments:
Post a Comment