Thursday, 6 February 2020

'हाजरी'मधून, पुन्हा एकदा मंगेश आणि तेजश्रीची जोडी झळकणार छोट्या पडद्यावर!!!

टेलिव्हिजन क्षेत्रात आपली छाप पडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानाच्या 'हाजरी' या गामी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. 'हाजरी' या चित्रपटात एक खास, आगळीवेगळी अशी प्रेमकहाणी पाहायला मिळेल. चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच, प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढलेली आहे. या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
हाजरी या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेमजेशीर गोष्ट म्हणजे याआधी तेजश्री आणि मंगेश यांनी एका चित्रपटात वडील आणि मुलीची भूमिका केली होती  त्यात मंगेशने नकारात्मक भूमिका निभावली होतीपण हाजरीमध्ये हे दोघेही जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेतया चित्रपटात मंगेश एका साध्या-सरळ कर्मचाऱ्याच्या भूमिकेत तर तेजश्री एका सडेतोडस्पष्टवक्ती तसेच स्वप्नाळू मुलीच्या भूमिकेत दिसणार आहेमंगेश आणि तेजश्रीची जोडीत्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक हेतहे दोन गुणी आणि उत्तम कलाकार पुन्हा एकदा एकत्र काम करणा असल्यानेत्यांचा चाहतावर्ग सुद्धा खुश असल्याचे दिसत आहेतेजश्री आणि मंगेशला पुन्हा एकत्र चित्रपटात पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच आणि ही पर्वणी प्रेक्षक  फेब्रुवारी रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता अनुभवू शकता.

No comments:

Post a Comment