Thursday, 6 February 2020

माई आणि शेवंताची जुगलबंदी माई शेर, शेवंता सव्वाशेर आणि अण्णा...???

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले ’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहेमालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या  भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेतयाचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातंमुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले ', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहेही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

नेने वकिलांच्या मदतीने शेवंताला नाईकांच्या वाड्यासमोरच घर मिळतंएकीकडे माई मात्र अण्णांना पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेतदुसरीकडे शेवंता हार  मानता धीटपणे सगळ्या परिस्थितीला सामोरी जातेयमाईंच्या कणखरपणापुढे अण्णा देखील काहीसे हतबल झालेले दिसत आहेतमाई आणि शेवंताची खुन्नस मालिकेची रंजकता अजून वाढवत आहेतअशातच शेवंताने सोशल मीडियावर तिचामाई आणि अण्णांचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना त्या फोटोला कॅप्शन द्यायला सांगितलं आहेया झक्कास फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेतअण्णा आणि शेवंताच्या जुगलबंदीमध्ये अण्णांचं काय होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

No comments:

Post a Comment