Tuesday 4 February 2020

होम मिनिस्टरच्या भारत दौऱ्यामुळे महाराष्ट्र बाहेरील प्रेक्षक आनंदी \ भावोजींना आलं हैद्राबादवरुन पत्र

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहेतर आदेशभावोजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेतकेवळ १३ भागांसाठी सुरु झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर देण्यात आली आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने आज सोळा वर्षांचा टप्पा पूर्ण केलाआता या लोकप्रिय कार्यक्रमाचा भारत दौरा सुरु आहे.
या भारत दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरील प्रेक्षकवर्ग खूप सुखावला आहेभारताच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं प्रेम आदेश बांदेकरांपर्यंत पोहचत आहेदिल्लीइंदूरअहमदाबाद इकडे दौऱ्या केलेल्या भावोजींना चक्क हैदराबादवरुन देखील एका चाहत्यांचा पात्र आलं ज्यात त्याने झी मराठी या वाहिनीचे आभार मानले आहेतझी मराठी सादर करत असलेले सगळेच कार्यक्रम आणि होम मिनिस्टरचा नुकताच सुरु झालेला भारत दौरा स्तुत्य असल्याचं त्यांनी या पात्रात सांगितलं आहेहोम मिनिस्टरच्या भारत दौऱ्यामुळे हि वाहिनी महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी समाजाला एकत्र आणतेय आणि त्यांच्याशी देखील नातं जोडतेय हे खरंच उल्लेखनीय आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेतभारताच्या विविध जिल्ह्यातून आपल्याला इतकं प्रेम मिळतंय हे पाहून आदेश बांदेकर देखील भारावून गेले

No comments:

Post a Comment