Friday, 10 September 2021

धमाल मनोरंजनाचा ‘मॅड’ तडका


रितिका श्रोत्री आणि विनायक माळी झाले मॅड

युथ... या शब्दातच एक वेगळी एनर्जी आहेतारुण्यात एक वेगळाच मॅडनेस प्रत्येकात भरलेला असतोया मॅडनेसमधूनच कधी कधी कल्पनेपलीकडच्या अतर्क्य गोष्टी घडत असताअसाच अतर्क्य असलेला मॅड हा युथफूलकलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय२०२२ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शि होईल.

मॅडनेस जगण्यात एक कैफ असतो.... हा मॅडनेस तुम्हाला काही मिळवू देऊ शकतो किंवा गोत्यात ही आणू शकतोवेडेपणाची हीच तुफानी झिं घेऊन लेखक समीर आशा पाटील आणि दिग्दर्शक निखिल विखजिनदार प्रेक्षकांना मॅड करायला सज्ज झाले आहेतनुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेया मोशन पोस्टरमधून त्यांच्या अफाट मॅडनेसची कल्पना येते.

या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोड़ी प्रेक्षकांच्या समोर येणार आहेअल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर 'मॅड या चित्रपटातून अनुभवता येणार आहेविनायक माळी वेगळ्याच अतरंगी अंदाजात ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहेठसकेबाज लव्हेबल रितिका श्रोत्री आणि अतरंगी विनायक माळी हे भन्नाट समीकरण  चित्रपटाची रंगत चांगलीच वाढवती हे नक्की.

डार्लिंग ह्या बहुचर्चित चित्रपटाची टीम तितक्याच उत्साहात ‘मॅड हा  रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी  सज्ज झाली आहेसमीर आशा पाटील पिक्चर्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहेसमीर आशा पाटील आणि व्हीजेशलाका हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांच्या या मॅडनेसची मॅड रोलर कोस्टर राइड प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे.

No comments:

Post a Comment