Monday, 11 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस सोळावा आदिश वैद्य स्वीकारणार पॉवर कार्ड

मुंबई ११ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री घरामध्ये झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावा लागले. तर बिग बॉस मराठीमध्ये काल झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री.  आदिश वैद्यचा काल धम्माकेदार performance झाला. आज आदिश घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहेत. बिग बॉस आदिशला बहुमूल्य temptation स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहेत आणि ते temptation आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. ज्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे temptation स्वीकारल्यास परिणाम स्वरूप या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे. आदिशने पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे.

आता बघूया आदिश कोणत्या तीन सदस्यांची नावं देतो ते आजच्या भागामध्ये. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment