मुंबई १० ऑक्टोबर, २०२१ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणारे वेगवेगळे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद - विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचे विषय आहेत. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत कोणताही मुखवटा न बाळगता ! बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री झाली. सगळ्यांचा लाडका आदिश वैद्य वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये एंटर झाला. आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल ? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का ? कोणत्या गृपचा आदिश सदस्य होणार ? कि तो त्याचा गृप तयार करणार ? कि स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
बिग बॉस मराठी या कार्यक्रमामधील स्पर्धक तर चर्चेत आहेतच जसे दादुस यांचा दिलखुलास अंदाज, गृप A, गृप B आणि घरात झालेला नवा गृप C म्हणजे क्लिअर, विशाल आणि विकासची मैत्री, जयचा बेधडक अंदाज, मीनलची बडबड, सदस्यांची टास्क जिंकण्याची जिद्द, घरामध्ये बनलेले हे गट तसेच महेश मांजरेकर यांची बिग बॉसची चावडी. आता वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आदिश बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यावर सदस्य नक्की काय बोलतील ? कसे त्याचे स्वागत होईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
आदिशने घरातील सदस्य तसेच त्याला कोण आवडते, कोणाशी मैत्री होईल ? याबद्दल देखील थोडं सांगितलं तो म्हणाला, “खूप उत्सुक आहे घरामध्ये जायला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीने खेळायचा प्रयत्न करतो आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेत असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विजेता म्हणूनच मला बाहेर यायला नक्की आवडेल.”
आता पुढील आठवड्यामध्ये प्रेक्षकांना घरामध्ये काय काय बघायला मिळणार आहे ? कोणत्या प्रकारचे टास्क असणार आहेत ? हे सगळच बघणं रंजक असणार आहे. तेव्हा नक्की पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment