Tuesday, 12 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस सतरावा ! स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय डावपेच आखणार ? “तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही” - स्नेहा वाघ

मुंबई १२ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे नॉमिनेशन कार्य. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे. आणि जीपमध्ये बसलेले सदस्य आहेत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. उत्कर्षचं म्हणण आहे स्नेहा म्हणत आहेत दोघी. आता स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणता डावपेच आखणार ? जयची साथ स्नेहाला मिळेल ? जाणून घेण्यासाठी बघा आजचा बिग बॉस मराठीचा भाग.

याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी. आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी तर काही त्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गृपमध्ये नकारात्मक भावना आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जय नंतर आता स्नेहा आणि आदिश मध्ये देखील वाद होणार आहे. एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे पण, त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे असं दिसत आहे. काही ना काही मुद्द्यांवरून खटके उडायला सुरुवात झाली आहे. आदिशचं म्हणण आहे “तुझं वैयक्तिकरित्या इरिटेशन असेल तर... पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलतो आहे ते देखील काऊंट होणार आहे”. यावर स्नेहाचे म्हणणे आहे “तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही तुम्हाला असं वाटतं असेल मी तुमच्याकडे यावं प्रतिक्रिया मागायला तर तसं होणार नाहीयेमी काय विचारू”. या नंतर आदिशने देखील विचारले काय? त्यानंतर हा वाद वेगळाच दिशेला गेला. बघूया नक्की काय झालं पुढे ते आजच्या भागामध्ये.

तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

No comments:

Post a Comment