Tuesday, 12 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस सतरावा टीमच्या निर्णयामुळे सुरेखाताई नाराज...

मुंबई १२ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात टास्क दरम्यान सदस्य एकमेकांवर नाराज नाही झाले किंवा त्यांच्यात मतभेद नाही झाले असे कमीच दिसून येते. काही ना काही कारणास्तव वाद विवाद हे होतातच. असं काहीसं होताना आज पुन्हा एकदा दिसून येणार आहे असं वाटतं आहे. टास्कच्या मध्ये टीममधील चर्चेत सुरेखा ताई थोड्या नाराज असल्याचे दिसून येणार आहेसुरेखाताईंनी टीमला विचारले, “तुमचं काय ठरतयं मग.  कसं करायचं”.  यावर मीनल म्हणाली, “जेव्हा बजर वाजेल तेव्हा आपण निर्णय घेऊ काय करायचे. आता मी विचारत होते याची काय चर्चा झाली. तेव्हा उत्कर्ष त्याला कुठे ना कुठे convince करण्याचा प्रयत्न करतो आहे तू ये तुला सेफ करू. उत्कर्षचं हेचं सुरू आहे तो प्रत्येकाला वेगवेगळी कहाणी सांगतो आहे. त्यावर तृप्तीताई म्हणाल्या, “पण आता तर ते म्हणाले की त्यांनी विकासला सांगितला सुरेखाताईंना पाठवा”.  त्यावर विकास म्हणाला “दादुस आमचं ठरलेलं आहे”. त्यानंतर प्रत्येकाने त्यांची त्यांची नावं नावं दिली... मीनलने आविष्कारचे नाव घेतले, तृप्ती देसाई यांनी सुरेखाताईंचे नाव घेतलं, विशाल म्हणाला आविष्कार. बहुमताने आविष्कार दारव्हेकरच नाव पुढे आल्यामुळे सुरेखा ताई म्हणाल्या मला माहिती होतं हे म्हणूनच....” आता नक्की काय झालं ? कळेलच.

बघूया पुढे काय झालं आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

No comments:

Post a Comment