पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडे खुमासदार सूत्रसंचालन आणि १४ लिटिल चॅम्प्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व गाजलं आणि अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. या १४ स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या १४ अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं.
ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणं खूपच अवघड आहे. महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ ही जणांनी मनसे प्रमुख 'राजसाहेब ठाकरे' यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूप भारावून गेले. राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पाहायला विसरू नका - सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम सोहळ्यात रविवार ५ डिसेंबर रोजी संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
No comments:
Post a Comment