किचन कल्लाकारच्या पहिल्या भागात हे कलाकार दाखवणार आपलं पाक-कौशल्य
कलाकार म्हंटल म्हणजे प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होणार हे नक्की पण कलाकार आणि किचन हे समीकरण नेहमीच जमेल असं नाही. त्यामुळे या कलाकारांना जर किचनमध्ये काही पदार्थ करायला लावला तर ते त्यात कितपत यशस्वी होतील हे आता प्रेक्षकांना देखील कळणार आहे झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर या कलाकारांचा किचनमध्ये कस लागणार आहे. त्यांच्या जोडीला जयंती कठाळे ह्या शेफ देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आता हे सर्व कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
या बद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, "शूटिंगमधून वेळ काढून किचनमध्ये जास्त वेळ देणं शक्य होत नाही पण किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये पाक-कौशल्य दाखवण्याचं शिवधनुष्य आम्ही कलाकार पेलवणार आहोत. यात आमची तारांबळ उडणार आहे पण यात प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन होईल आणि त्यांना आमचा हा वेगळा पैलू बघताना देखील मजा येईल."
तेव्हा पाक-कौशल्य सोबत धमाल मस्ती ही पाहायला विसरू नका आपल्या 'किचन कल्लाकार' वर बुधवार, १५ डिसेंबर पासून दर बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!
No comments:
Post a Comment