Wednesday, 15 December 2021

झी मराठी | ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील ‘शलाका’ आहे या अभिनेत्रीची मुलगी

झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका प्रेक्षकांना आवडतेय, हे प्रेक्षकांच्या मालिकेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादावरून कळतंय. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या अतिशय दर्जेदार रित्या झालेल्या आहेत. मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दीपुची भूमिका साकारत असून अभिनेता अजिंक्य राऊत इन्द्रा ही भूमिका साकारतोय. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत. लवकरच शलाका ही लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मालिकेत शलाका हि खूप साधी भोळी आणि हळवी आहे. ही भूमिका शर्वरी कुलकर्णी साकारतेय.

प्रेक्षकवर्ग कधी कधी खूप उत्सुक असतो जाणुन घेण्यासाठी कि उत्तम अभिनय करणारी नायिका हि कुणा एखाद्या मोठ्या प्रख्यात अभिनेता किंवा अभिनेत्रीची तर मुलगी नसेल ना? तर अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साठी प्रेक्षकांना पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की... शर्वरी कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट मालिका तसेच नाटकात एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी ही देखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे. “मन उडू उडू झाल” या मालिकेतील शलाका या भूमिकेसाठी शर्वरी हिने मेहनत घेतली असून तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुप आवडतेय.

No comments:

Post a Comment