Tuesday, 7 December 2021

शेमारूमीवर पहायला मिळणार उत्कृष्ट मराठी सिनेमे


ओटीटीवर इतका भरपूर मराठी कन्टेन्ट उपलब्ध आहे की त्यातून दर्जेदार पाहण्यासारखे काय हे ठरवणे चांगलेच कठीण होऊन बसते.  पण आता तुमचा हा संभ्रम चुटकीसरशी दूर होईल कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोतखास निवडलेलेचांगले आयएमडीबी रेटिंग असलेले उत्कृष्ट मराठी चित्रपटजे पाहिल्यावर तुमचा मौल्यवान वेळ खूप छान कारणी लागल्याचे समाधान तुम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. 

१)  रझाकार - आयएमडीबी रेटिंग ८.२/१०

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलाअतिशय भावस्पर्शी असा हा नाट्य चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे.  स्वातंत्र्य चळवळीच्या दिवसांमध्ये घेऊन जाणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन राज दुर्गे यांनी केले असून १९४८ सालच्या हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयीच्या एका सत्यकथेवर तो आधारित आहे.  एक सर्वसामान्य माणूस ते स्वातंत्र्यसेनानी असा संपूर्ण प्रवास या सिनेमात चित्रित करण्यात आला आहे.  सिद्धार्थ जाधवज्योती सुभाषझाकीर हुसेनडॉ. शरद भुताडियागौतम पाटील आणि पियुशा कोलते यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला हा सिनेमा आवर्जून पहावा असा आहे.

२)  उंडगा - आयएमडीबी रेटिंग ८/१०

या प्रणयनाट्य सिनेमामध्ये मैत्री आणि नातेसंबंध यांच्यातील उतारचढाव आकर्षकरित्या रंगवण्यात आले आहेत. विक्रांत नंदकुमार वर्दे यांनी दिग्दर्शित केलेली ही कथा आहे विज्या आणि गण्याची.  यातला विज्या अभ्यासू तर गण्या मस्तीखोर आणि सतत काहीतरी गोंधळ घालणारा आहेहे दोघेही आपापल्या आयुष्याच्या वाटेवर निवांत चालत आहेत. पण जेव्हा मीरा ही सुंदर तरुणी त्यांच्या जगात येते तेव्हा मात्र त्यांच्या या मैत्रीमध्ये चांगलीच खळबळ उडते. संग्राम समेळअरुण नलावडेशर्वरी गायकवाडशिवानी बावकरस्वप्नील कणसे आणि चिन्मय संत या कलाकारांनी यामध्ये भूमिका केल्या आहेत.

३)  व्हीआयपी गाढव - आयएमडीबी रेटिंग ७.१/१० 

तुम्हाला धम्मालमस्ती करवायला आणि पोट धरून हसवायला येत आहे एक व्हीआयपी गाढव. एका लहानश्या गावातील एक जखमी गाढव स्थानिक राजकारणाचे अतरंगी रंग अशा काही अनोख्या तऱ्हेने दाखवते की हसून हसून पुरेवाट होते.  या विनोदी नाट्य चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संजय पाटील आणि भाऊ कदमभारत गणेशपुरेविजय पाटकर अशा नामी आणि अतिशय लोकप्रिय कलाकारांनी आपल्या अभिनयाने हा सिनेमा रंगतदार केला आहे.   

४) त्या रात्री पाऊस होता - आयएमडीबी रेटिंग ७.१/१०

गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'त्या रात्री पाऊस होताहा एक अतिशय धीट थरार नाट्यपट आहे.  सुबोध भावेअमृता सुभाषसोनाली कुलकर्णी आणि सयाजी शिंदे या दिग्गज कलाकारांच्या अभिनयामुळे सिनेमाला आगळीवेगळी उंची लाभली आहे. एकमेकांपासून ताटातूट झालेली दोन भावंडे कित्येक वर्षांनी भेटतात ती एका अतिशय दुःखद परिस्थितीतबालपणीच्या सुखद दिवसांच्या आठवणींना उजाळा देत असतानाच आपल्या आईवडिलांविषयीचे भयानक सत्य उलगडत जातेअसा हा सिनेमा अलगदपणे आपल्या मनाचा ठाव घेतो.

No comments:

Post a Comment