Wednesday, 8 December 2021

सॉल्व.केयर (Solve.Care) ने सुरु केले केयर.लॅब्स (Care.Labs), हे नवे विकास पोर्टल डॉक्टरांना प्रदान करणार आरोग्यसेवा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती


8 डिसेंबर 2021: सॉल्व.केयर (Solve.Care) या जागतिक स्तरावरील आरोग्यसेवा क्षेत्रातील ब्लॉकचेन तंत्रज्ञान कंपनीने केयर.लॅब्स (Care.Labs) हे नवे विकास पोर्टल सुरु करण्यात आल्याची घोषणा आज केली. केयर.लॅब्स पोर्टल डॉक्टर्स आणि डेव्हलपर्स या दोघांनाही सॉल्व.केयरच्या विकेंद्रीकृत ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर केयर नेटवर्क्सची रचना करण्यात आणि ते निर्माण करण्यात मार्गदर्शन करण्यात मदत करेल.

केयर (Care) नेटवर्क हे डिजिटल आरोग्य नेटवर्क आरोग्यसेवा क्षेत्रातील सर्व हितधारकांना एकत्र जोडतेज्यायोगे ते आपल्या रुग्णांना सुव्यस्थित पद्धतीने आरोग्यसेवेचा उत्तम अनुभव प्रदान करू शकतात.  केयर.लॅब्स (Care.Labs) डॉक्टरांना आरोग्यसेवा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात अधिक सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सक्षम बनवतेयामध्ये ते आपल्या स्वतःच्या आरोग्यसेवा विकेंद्रीकृत सुविधांची रचना तयार करू शकतात तसेच याठिकाणी त्यांना जगभरातील समविचारी सहकाऱ्यांसोबत काम करण्याच्या संधी मिळतात. आरोग्यसेवा क्षेत्रात अशाप्रकारचे लाभ यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हते.

नुकतेच सुरु करण्यात आलेले ग्लोबल टेलिहेल्थ एक्स्चेंज हे केयर नेटवर्कचे एक उदाहरण आहे.  हे सॉल्व.केयर (Solve.Care) ने विकसित केलेलेआंतरराष्ट्रीय स्तरावरविविध देशांदरम्यान कार्यरत असलेले एक टेलिमेडिसिन नेटवर्क आहे ज्याच्या मार्फत रुग्ण जगभरातील डॉक्टर्स आणि विशेषज्ञांसोबत टेलिकन्सलटेशन्ससाठी संपर्क साधू शकतात.

स्वतःची आरोग्यसेवा नेटवर्क्स डिझाईन व निर्माण करून डॉक्टर्स त्यांची प्रॅक्टिस कार्यक्षमकमी खर्चाची आणि अधिक जास्त रुग्ण-केंद्रित बनवू शकतात. केयर.लॅब्स (Care.Labs) मध्ये कागदपत्रेट्युटोरियल्सव्हिडिओज्सपोर्ट ब्लॉग्स आणि गाईड्स हे सर्व नीट एकत्र करून ठेवले जातेज्यामुळे प्रॅक्टिशनर्सना मूलभूत गोष्टी शिकून त्यांची स्वतःची आरोग्यसेवा विकेंद्रीकृत केयर नेटवर्क्स निर्माण करणे सुरु करता येते.  बऱ्याच डॉक्टरांना इच्छा असेल पण माहिती आणि वेळ यांच्या अभावामुळे करणे शक्य होत नसेल तर त्यांना स्पॉन्सर्ड केयर नेटवर्क निर्माण करण्यासाठी एका विशेष डेव्हलपर टीमकडून तंत्रज्ञानसंदर्भात पाठिंबा मिळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. आजच्या काळातील आरोग्यसेवा क्षेत्रातील गुंतागुंत लक्षात घेता ही सुविधा अगदी योग्यवेळी उपलब्ध करवून दिली जात आहे.

हे या विकास पोर्टलचे प्रथम प्रकाशन आहेयामध्ये डॉक्टर्स आणि डेव्हलपर्स सॉल्व.केयर (Solve.Care) प्लॅटफॉर्मत्यातील वेगवेगळे भाग यांची माहिती जाणून घेऊ शकतातस्वतःचे केयर नेटवर्क कसे निर्माण करायचे ते समजून घेऊ शकतील आणि सॉल्व.केयरच्या समर्पित गिटहब रिपॉझिटरीचा वापर करून सॅन्डबॉक्ससह प्रयोग करून स्वतःचे केयर नेटवर्क उभे करू शकतात. 

सॉल्व.केयरचे (Solve.Care) सीईओ श्री. प्रदीप गोयल यांनी यावेळी सांगितले, "डॉक्टर्स सर्वात पुढे फ्रंटलाईनवर आहेत आणि आरोग्यसेवा क्षेत्राच्या तातडीच्या गरजा नेमक्या कोणत्या आहेत व सध्या कमतरता नेमक्या कुठे व कोणत्या आहेतयाची सर्वात जास्त जाण त्यांना आहे.  रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिकाधिक लाभ प्रदान केले जावेत यासाठी आरोग्यसेवा क्षेत्रात नवपरिवर्तन घडवून आणण्यासाठी जगभरातील डॉक्टर्सना त्यांची कौशल्ये व ज्ञान यांचा अधिकाधिक क्षमतेने वापर करता यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही केयर.लॅब्स (Care.Labs) सुरु करत आहोत.  आता आरोग्यसेवा क्षेत्र ज्या परिस्थितीत आहे त्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्यांसाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत."  

केयर.लॅब्स (Care.Labs) विकास पोर्टल सातत्याने अधिकाधिक विकसित होत जाईलयामध्ये नवनवीन सुविधा आणि टूल्सचा समावेश केला जाईल.  यामुळे डॉक्टर्स आणि डेव्हलपर्सना सर्वाधिक गुंतागुंतीची केयर नेटवर्क्स देखील अगदी सहज निर्माण करण्याची क्षमता प्रदान केली जाईल. सॉल्व.केयर (Solve.Care) आपल्या या नवीन सुविधेसह डॉक्टरांना आजवर कधीही न पाहिलेल्या डिजिटल क्षमता उपलब्ध करवून सक्षम बनवत आहे.

No comments:

Post a Comment