*असे पातकी दीन मी स्वामीराया । पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ।*
मुंबई २५ एप्रिल, २०२२ : प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात हा क्षण कधीतरी नक्कीच आला असेल. स्वामींचे भक्त म्हणून तुम्ही निर्मळ मनाने स्वामी माउलीला हाक दिलीत आणि स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही असं झालं नाही. आयुष्यातल्या चांगल्या-वाईट अशा सगळ्या प्रसंगी तुम्ही स्वामींना शरण गेलात कि स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपण अनुभवतोय, काळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या कृपेची प्रचिती भक्तांना येतच आहे...म्हणूनच कलर्स मराठी वाहिनीने स्वामी भक्तांना आलेल्या स्वामी कृपेच्या प्रचितीचा अनुभव इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला. स्वामींच्या आशिर्वादाने आणि आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे “प्रचिती स्वामी कृपेची” हा उपक्रम यशस्वी झाला. या उपक्रमात विजेते असलेले काही भाग्यवान भक्तआणि मालिकेतील कलाकार यांची भेट परळ येथील स्वामी समर्थ मठात वाहिनीद्वारे घडवून आणली. प्रेक्षकांच्या विश्वास आणि प्रेमामुळे आपण आपले खाजगी अनुभव मालिकेच्या माध्यमातून सांगितले त्याबद्दल संपूर्ण “जय जय स्वामी समर्थ” मालिकेतर्फे आणि कलर्स मराठी वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार.
कलर्स मराठी वाहिनीवरील “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेत स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर, चोळप्पाची भूमिका साकारणारे स्वानंद बर्वे आणि चंदाची भूमिका साकारणारी विजया बाबर यांनी उपक्रमाच्या महत्वाच्या टप्प्यात या भाग्यवान विजेत्यांना भेट दिली आणि त्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment