दिनांक : १४ जून २०२२
‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था, मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण देणारे देशातील पहिले वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राची उभारणी विरार, अर्नाळा येथे लवकरच होणार असून, श्री स्वामी कृपा, प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार येथे २ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते या वास्तूचे भूमिपूजन संपन्न झाले होते. नुकतेच या ठिकाणचा जुना बंगला जमीनदोस्त करून नव्या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरु झाले आहे. या नव्या इमारतीच्या बांधकाम व निर्मिती कार्यासाठी जवळपास अडीच करोड रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सर्व स्तरातील दात्यांनी या उपक्रमाच्या निर्मितीसाठी आर्थिक हातभार लावावा असे जाहिर आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे यांनी एका निवेदनाद्वारे प्रसार माध्यमांना कळविले आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ने या उपक्रमास मान्यता दिली असून या वसतिगृहात अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब २० मुली व २० मुले आणि त्यांचे एकल पालक विनामूल्य राहणार आहेत. हे वसतिगृह येत्या वर्षातील सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने लवकरात लवकर समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते संस्थेला मदत करून उपकृत करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
देणग्यांची रक्कम 80G / CSR1 अंतर्गत कर मुक्त आहे.
संस्थेची अधिकृत वेबसाईट : https://www.nutanfoundation.
No comments:
Post a Comment