Monday, 6 June 2022

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेमध्ये साजरी होणार वटपौर्णिमा ! बघायला मिळणार अंतराचा पारंपरिक लुक...

 

मुंबई ६ जून, २०२२ : ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण. वरुणराजाचं आगामन झालं की, सर्व स्त्रियांना आतुरता असते ती म्हणजे “वटपौर्णिमा” या सणाची. खरंतर या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते असं म्हणायला हवं. हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला भाग पाडतो. वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाच्या पुजनाला मोठं महत्त्व आहे. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये अंतराची पहिली वटपौर्णिमा असून  खानविलकर कुटुंब मोठ्या उत्साहात ती साजरी करणार आहे. अंतराने यासाठी छान अशी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहेगजरा घातला आहे, पारंपरिक दागदागिने घातले आहेत. अंतराची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने घरात उत्साहाचे वातावरण आहे. पण आता, या आनंदात श्वेता मिठाचा खडा टाकणार आहे. श्वेता मल्हारला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, दुसरीकडे अंतरा चित्रा काकीचा पर्दाफाश करणार आहे. आता हे सगळं कसे घडणार? कसं अंतरा चित्राचं खरं रूपं सगळ्यांसमोर आणणार ? हे बघायला मिळणार आहे. तर श्वेता तिच्या कारस्थानात यशस्वी होईल का की अंतरा तिचा डाव उलटून लावेल हे देखील बघणे रंजक असणार आहे.

No comments:

Post a Comment