Thursday, 9 June 2022

'राजहंस विद्यालया'च्या 'फुटबॉल टीम'चे अबीर जितानीकडे कर्णधारपद!

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या १० वर्षातील विजयी परंपरा कायम राखणाऱ्या 'राजहंस विद्यालया'च्या फुटबॉल टीमचे नेतृत्व करण्यासाठी या विद्यालयाचा अष्टपैलू खेळाडू अबीर जितानीची नुकतीच निवड करण्यात अली असून कर्णधारपची सूत्रे त्याच्याकडे सोपविण्यात आली आहेत. राजहंसच्या मुख्याध्यापिका श्रीमती कलादेवी गंगाधरनक्रीडा प्रमुख मनोज नायर, ‘सॉफ्टबॉल’ आणि बेसबॉलचे मुंबई उपनगर सचिव त्रिभुवन सिंग, ‘फुटबॉल’ प्रशिक्षक प्रज्वल चंदन, ‘सॉफ्टबॉल’ आणि बेसबॉल’ प्रशिक्षक विकी मिश्रा यांच्या उपस्थिती ही घोषणा करण्यात आली.

फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी नेमणूक झाल्यानंतर अबीर जितानी म्हणाला "कोविड-19 मुळे आमच्यापैकी कोणीही तीन वर्षांपासून प्रत्यक्ष सराव केलेला नाही. आम्ही सातवीतून थेट १०वी मध्ये आणि मैदानातही आलो आहोत. विद्यालयाचे पूर्वीचे नावलौकिक विक्रम आणि प्रतिष्ठा जपणं हेही माझं कर्तव्य आहे. मला आणि माझ्या टीमसाठी हे एक आव्हान असून या संधीचा पुरेपूर उपयोग विद्यालयाचा गौरव वाढविण्यासाठी करण्याचा माझा प्रयत्न असेल.

मुंबई ग्लॅमर नगरीतील अर्थात 'अंधेरी पश्चिम'ला अकरा एकरच्या निसर्गसंपन्न परिसरातील 'राजहंसविद्यालयाची गेली दहा वर्षे महाराष्ट्रात सरशी राहिली आहे. आंतरविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये 'राजहंसविद्यालय राज्यात अव्वलस्थानी आहे. आजमितीस या विद्यालयाच्या खेळाडूंना जगभरात आपला खेळ करण्याची संधी मिळाली आहे. फुटबॉलकब्बडीखो खोटेनिसबॅडमिंटन या खेळांसोबतच 'सॉफ्टबॉलआणि 'बेसबॉलअश्या ऑलम्पिक खेळांतही वर्चस्व मिळवून गेली दहा वर्षे राज्यात आपलं नावलौकिक राखण्यात 'राजहंस'च्या खेळाडूंना यश आले आहे.

No comments:

Post a Comment