अक्षय केळकर आणि ती - अक्षयने सांगितला ब्रेक अपचा किस्सा !
शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा, अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे - अक्षय केळकरचा सल्ला !
मुंबई ७ ऑक्टोबर, २०२२ : अक्षय केळकरला नात्यातीलच कोणी एक मुलगी मेसेजेस पाठवत होती जे त्याच्या आईच्या निदर्शनास आले आणि त्याचबद्दल अक्षयने सदस्यांना सांगितला किस्सा. त्याने मेसेजेस इग्नोर केले पण आईने मात्र सांगितले कि, मुलगी तुला मेसेजेस करतं आहे, तुझ्यात इंटरेस्टेड असावी. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो... त्यांच्यात झाली बरीच चर्चा. अक्षय म्हणाला छानचं होते ते क्षण, पण तो ब्रेक अप झाला आणि... माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनी जुळवून दिलं. एका इव्हेंटला गेलो असता मला सांगितलं काय सल्ला देशील तो म्हणाला, "मी सल्ला नाही देणार पण, माझे आई बाबा नववी नापास आहेत, रिक्षावाला घरं सांभाळतो आहे, इतका फ्रिडम दिला दोन्ही मुलांना कि ते बरोबर मार्गावर चालत आहेत... शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे.
मला शाळेत जायला खूप आवडायचं - यशश्री मसुरकर
सदस्य रमले शाळेच्या आठवणींमध्ये !
मुंबई ७ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरात यशश्री, किरण, योगेश, समृद्धी, विकास यांच्यात रंगल्या शाळेच्या गप्पागोष्टी आणि ते रमले आठवणींमध्ये. यशश्रीचे म्हणणे आहे मी आज जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळे. शाळेमध्ये मी ऑल rounder होते सगळं करायचे न्युज वाचायचे, प्रार्थना म्हणायचे, आणि सांगितला शाळा ते कॉलेजपर्यंतचा प्रवास आणि कशी जिंकली एक फेमस स्पर्धा.
बघूया आजच्या भागात. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.
No comments:
Post a Comment