Saturday, 22 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १९! त्रिशुल - योगेश आमनेसामने !

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १९!

त्रिशुल - योगेश आमनेसामने !

मुंबई २१ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  सुरु आहे  "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य. कार्या मध्ये मिळालेल्या ब्रेक मध्ये सदस्यांमध्ये सुरु आहे चर्चा आणि बनवत आहेत स्ट्रॅटेजि कसं आपल्याला जिंकता येईल आणि कोणाच्या विरोधात कोणाला पाठवायचे. अक्षयने विचारले योगेशच्या विरोधात कोण खेळणार ? मेघा ताई आणि समृद्धी असे म्हंटले असता अक्षय म्हणाला नाही चूक त्रिशूलला पाठवूया... अपूर्वा या निर्णयावर सहमत झाली म्हणजे योगेशच्या विरोधात त्रिशूल आणि ताई खेळणार आपल्याकडून. तेजस्विनीच्या टीममध्ये देखील याचविषयी सुरु असताना योगेश म्हणाला, त्रिशूल, अक्षय... मुलगा किंवा मुलगी कोणी येऊ देत मी नाही बघणार पुढे कोण आहे. पुढे कार्यात त्रिशुल - योगेश आमनेसामने येणार आहेत.

आता पुढे काय होणार ?  कोण बाजी मारणार ? कोण घराचा कॅप्टन बनणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

No comments:

Post a Comment