Friday 28 October 2022

वऱ्हाडी वाजंत्रीची भन्नाट टायटल्स!

चित्रपट ही एक मनोरंजनाची अद्भुत कला तर ती पाहणं हा विलक्षण अनुभव. आजपर्यंत विविध जातकुळीच्या चित्रपटातून प्रबोधनापासून मनोरंजनापर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत अनेकविध आशय विषयाने प्रतिभावंतांच्या प्रतिभा उजळल्या आहेत. आपल्या चित्रपटाला रसिकांच्या हृदयात स्थान मिळावे यासाठी ते नानाविविध प्रयत्न करताना दिसतात. असंच काहीतरी वेगळं अफलातून मनोरंजन करण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सज्ज झाले आहेत. त्यांच्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या वऱ्हाडी वाजंत्री या धम्माल विनोदी चित्रपटासोबत.

अनेक चित्रपटांची टायटल्स रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. विषयाला अनुसरून आपल्या चित्रपटाची टायटल्स करण्यासाठी निर्माते दिग्दर्शक जंगजंग पछाडत असतात. विशेष टॅलेंटचा वापरून करून आकर्षक टायटल्स निर्मितीवर भर दिला जातो. अश्याच काहीश्या भन्नाट कल्पनांमध्ये आपल्या चित्रपटाचं नाव रसिकांच्या मनःपटलावर कोरण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सध्या गुंतले आहेत. त्यांच्या वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटाचे टायटल्स तयार करण्याचे काम जोमात सुरु आहे. प्रख्यात पब्लिसिटी डिझायनर मिलिंद मटकर भन्नाट कल्पना योजली असून त्यावर कलाकाराचं बारकाईने निरीक्षण करून गंमतशीर कार्टून रेखाटण्यात विजय शिंदे हा हरहुन्नरी कलावंत गुंग झाला आहे. दिग्दर्शक विजय पाटकर आणि निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या संगनमताने या चित्रपटाची धम्माल उडवणारी श्रेयनामावली मिश्किल विनोदी हावभावांसह अनोख्या स्टाईलने पडद्यावर आणण्यासाठी सर्वांची घालमेल सुरु झाली आहे.

 

नावाप्रमाणेच या चित्रपटात एकापेक्षा अवखळ विनोदवीरांना घेऊन दंगा करण्यासाठी विनोदाचा बादशहा मकरंद अनासपुरे वऱ्हाडी वाजंत्र्यां’सह येत असून. त्याच्यासह २१ नमुनेदार विनोदवीरांच्या मिश्किल छटा विनोदी ढंगात टायटल्समध्ये उमटविण्याच्या अवघड कामात सध्या ही चौकडी व्यस्त असून मकरंद अनासपुरे यांचे भन्नाट विनोदी कार्टून लहान थोरांना गुदगुल्या करणारे असून त्यांच्या या छबीचे 'मिम्सचित्रपट आल्यावर होतील हे नक्की. त्यासोबतच पॅडी आणि हेमांगीचीही कार्टून्स लयभारी झाली असून तीही रसिकांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाहीत. याहून जबरदस्त म्हणजे मोहन जोशीरीमा यांचे बुलेटराजा-राणीचे’ दर्शन म्हणता येईलयासोबतच प्रिया बेर्डे - विजय कदम यांच्या ठुमक्याचा ठेका कमाल झाला आहे. तर जयवंत वाडकरआनंदा कारेकरसुनील गोडबोलेपूर्णिमा अहिरेगणेश रेवडेकरप्रभाकर मोरेप्रशांत तपस्वीराजेश चिटणीसजयवंत भालेकरविनीत बोंडेशिवाजी रेडेकरआशुतोष वाडेकरशीतल कलाहपुरेसाक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही इरसाल नमुनेबाज व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या कथेसोबतच 'टायटल्समधेही धम्मालकरणार असल्याने हे वऱ्हाडी वाजंत्री प्रेक्षागृहात हशाच हशा पिकणार हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर वाट पाहुयात ११ नोव्हेंबरची.

No comments:

Post a Comment