Friday, 21 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १९ ! घरात सुरु आहे "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य “पण.... दोघीपण विमझिकल आहेत…” – अपूर्वा

मुंबई २१ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य. अपूर्वा आणि तेजस्विनी मध्ये हे कार्य पार पडणार असून कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळेलच. पण, दोन्ही ग्रुप मधील सदस्य भन्नाट स्ट्रॅटेजि आणि प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या कॅप्टनसी कार्यामध्ये कोण कोणाची वाजवणार? अपूर्वा नि तेजस्विनी मध्ये कोण कोणाला मागे टाकून बनेल घराची नवी कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. अपूर्वा त्रिशूलला सांगताना दिसणार आहे, त्यांनी सगळं उचललं असेल आणि फेकलं असेल शक्तीच्या बळावर पण युक्ती देखील लागते जी त्यांच्याकडे नाहीये. मेघाचे म्हणणे आहे, आपली कॉपी करायला गेले, तुम्हांला का नाही सुचतं आधी... त्यावर अपूर्वाचे म्हणणे आहे आणि गणले कारण प्लॅन माहितीच नाहीये. तेजस्विनी टीमला सांगताना दिसणार आहे, मेघा ताई ज्यारित्या भांडतात काही बघतच नाही त्या. टास्क दरम्यान अक्षय, समृद्धी आणि अपूर्वामध्ये चर्चा रंगली असून चर्चा सुरु आहे अमृता धोंगडे आणि यशश्रीबद्दल. अपूर्वा अक्षय आणि समृद्धीला सांगताना दिसणार आहे,"अमृता प्रचंड चिडली आहे, हे लक्षात ठेवा. यशश्री पण.... दोघीपण विमझिकल आहेत." बघूया आज टास्क मध्ये पुढे काय घडलं.

अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

No comments:

Post a Comment