Friday 21 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १९! योगेशचा राग झाला अनावर आणि...

मुंबई २१ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य. कार्या दरम्यान शाब्दिक चकमक, वादावादी, भांडणं, मारामारी हे आपण बघत आलो आहोत. सदस्यांना बऱ्याचदा त्यांच्या रागावर नियंत्रण राहात नाही आणि ते असे काही करून बसतात कि नंतर त्यांना त्या गोष्टीचे वाईट वाटते. असंच काहीसं आज घरामध्ये होणार आहे. इतर सदस्यांशी वाद घालताना योगेशचा राग अनावर झाला आणि... मेघाताई आणि योगेशमध्ये कार्या दरम्यान वादावादी झाली. मेघा ताई म्हणाल्या, "अरे तुझं डोकं गुडघ्यात... दोन्ही गुडघ्यात आहे ते सांभाळून ठेव मेंदू तुझा... योगेशने एक शब्द खाली पडू नाही दिला  त्याने उत्तरं दिले... अपूर्वा म्हणाली, याचे जेवढे वयं नाहीये ना तितकं तिचं करिअर आहे. सदस्यांनी योगेशला शांत करण्याचा प्रयत्न केला पण... बघूया पुढे झालं आजच्या भागामध्ये ... 

बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. 

No comments:

Post a Comment