Wednesday, 15 February 2023

मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत आवाहन!


मराठी भाषेची जोपासना करण्यासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र यावे!” - योगेश दशरथ

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रूवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचा दैदीप्यमान इतिहास आठवावामराठी भाषेच्या वैभवाचा अभिमान बाळगावा तसेच मराठी भाषिकांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन मराठी भाषेची जोपासना करण्यासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत ही अपेक्षा आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर धरून २७ फेब्रूवारी २०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक तरी पुस्तकऑडिओबुक किंवा ईबुक विकत घेऊन आपल्या प्रिय व्यक्तीला भेट द्यावे असा आवाहन आम्ही करत आहोत. आपण आपल्या मुलांनामित्रांना किंवा नातेवाईंकांना मराठी पुस्तकेऑडिओबुक्स किंवा ईबुक्स विकत घेऊन भेट दिली तर मराठी भाषेतील आर्थिक व्यवहार वाढेल. स्वाभाविकच मराठी प्रकाशन क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लाभेल व त्यातून लेखकप्रकाशकअभिवाचक अशाच सर्वच घटकांना प्रोत्साहन मिळेल व जास्तीतजास्त पुस्तकेऑडिओबुक्स किंवा ईबुक्स प्रकाशित होतील. असा उपक्रम राबिण्याची कल्पना डिजिटल पुस्तक युगातील कल्पक तरुण म्हणून ख्यातकीर्त असलेल्या योगेश दशरथ यांची आहे. नुकतीच एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली.

यासाठी समाज माध्यमातूनही विविध संस्थांनामान्यवरांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करणार असून त्यांनी किमान एक मराठी पुस्तकऑडिओबुक किंवा ईबुक खरेदी करून आपल्या आवडत्या व्यक्तिला भेट देतानाची छायाचित्र आणि मजकूर समाज माध्यमातून पोस्ट करून मराठी भाषेबद्दलची आपुलकी व्यक्त करावी आणि या संकल्पनेचा प्रसार व प्रचारही करावा आणि ही संकल्पना एक समूह म्हणून राबवावी असे आम्हाला वाटते. यात प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. वृत्तपत्रे बातमी व लेख छापू शकतातरेडिओ व टि.व्ही. निवेदक आपल्या निवेदनातून त्या दिवशी सर्वांना आवाहन करू शकतात.     

या संकल्पनेबद्दल या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशीमराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वेजागतिक मराठी अकादमीचे सचिन इटकरस्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथथिंकबँक युट्यूब चॅनेलचे प्रमुख विनायक पाचलग आणि स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment