बृहन्मुंबई महानगगरपालिका (BMC) च्या मालकीचे पहिले केंद्र BMC चे महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी IAS यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला डिलिव्हरी पार्टनर्सचा सत्कारही केला. झोमॅटोने एक फिल्मदेखील लाँच केली. यात हे केंद्र महिलांना दुचाकी चालवण्यासारखे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य शिकवून कसे सक्षम करेल, ज्यामुळे गिग वर्कसह विविध व्यावसायिक संधींचे दरवाजे उघडतील, हे दर्शवण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने जनाधार असलेल्या BMC सारख्या राष्ट्रीय आणि स्थानिक संस्थांच्या मदतीने, झोमॅटो महिलांना दुचाकी इलेक्ट्रिक वाहने (EVs) चालवण्याचे प्रशिक्षण देईल. रायडिंग कौशल्यासोबतच या उपक्रमाद्वारे महिलांना शहरांमध्ये दिशा शोधण्यासाठी स्मार्टफोन वापरणे आणि आयुष्यातील सर्व आघाड्यांवर कणखर संवाद क्षमता यांसारख्या जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
मुंबई, अहमदाबाद यांसारख्या प्रत्यक्ष केंद्रांद्वारे झोमॅटो हे प्रशिक्षण देईल. व्यावहारिक कौशल्य आणि शिकण्याचे उत्तम वातावरण प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याचे इतर फायदे:
· महिलांना भेटी घेण्यासाठी, चौकशी करण्यासाठी आणि गिग अर्थव्यवस्थेत काम करण्याकरिता मार्गदर्शनासाठी एक समर्पित केंद्र उभारले जाईल.
· पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या महिलांबद्दल काळजी करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना आश्वस्त करणारे एक बैठकीचे केंद्र असेल.
· EV-बाइक शोधण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी इच्छुक सहभागींना मार्गदर्शन केले जाईल.
बृहन्मुंबई महापालिकेचे महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, IAS या उपक्रमाविषयी म्हणाले, ‘महिलांना टू व्हिलर चालवण्यासारखे व्यावहारिक कौशल्य प्रदान केल्याने त्यांच्यासाठी संधींचे जग खुले होईल. बदललेला वेग आणि अपारंपरिक उपजीविकेच्या पर्यायांची कसर भरून काढणारे हे झोमॅटोचे महिला रायडिंग केंद्र आहे. या उपक्रमाला सहकार्य करत असताना आम्हाला अभिमान वाटतोय. यामुळे महिलांना त्यांचे भविष्य नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मिळते.’
या उपक्रमाविषयी बोलताना झोमॅटोच्या चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर अंजली रवी कुमार म्हणाल्या, ‘झोमॅटो कंपनीत आम्ही एक चिरंतन आणि सर्वसमावेशक फुड डिलिव्हरी इकोसिस्टिम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. इथे महिलांना समान संधी दिल्या जातील व त्या आमच्या उद्योगवृद्धीसाठी हातभार लावू शकतील. महिला रायडिंग सेंटर हा उपक्रम महिलांना केवळ दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देणार नाही. तर त्यासोबतच आवश्यक जीवन कौशल्ये आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे. गिगवर्कसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी सरसावलेल्या सर्व NGO आणि सरकारी भागीदारांचे खूप खूप धन्यवाद… ’
झोमॅटोच्या लाइव्हलीहूड उपक्रमाचा भाग म्हणजे हा उपक्रम आहे. याद्वारे महिलांच्या मार्गातील लिंगविषयक अडथळे दूर करत, लॉजिस्टिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधी देत महिलांना सक्षम केले जाते. झोमॅटोशी संलग्नित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 10,000 हून अधिक महिलांना प्रशिक्षण देणे, असा याचा उद्देश आहे. सध्या झोमॅटो आणि ब्लिंकिट इकोसिस्टिममधील जवळपास 5,000 पेक्षा महिला लॉजिस्टिक क्षेत्रात काम करत आहेत. झोमॅटोद्वारे पुरस्कृत महिला रायडिंग सेंटरबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया womenskilling@zomato.com या वर ईमेल पाठवा.
No comments:
Post a Comment