Thursday, 6 June 2019

A Marathi film underlining the fundamental principle to lead a fulfilling life- ‘Shri Ram Samartha’ - सर्वोत्तम जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारा मराठी सिनेमा ll श्री राम समर्थ ll


लहानपणापासून मनावर कोरलेले मनाचे श्लोक हा राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहून  ठेवलेला 'दासबोध' ग्रंथ आजच्या कठीण परिस्थितीत मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या  मार्गदर्शनाचे अनेक पैलू ''श्री राम समर्थ'' या समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्रपटात उलगडणार आहेत. नाशिक च्या सुप्रसिद्ध वकील सौ विजया माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून आणि श्री प्रकाश सुरवसे  यांच्या  अथक प्रयत्नातून साकारलेल्या तसेच दिशा दिपा फिल्म्स (दिपा सुरवसे) आणि विप्र एंटरटेनमेंट (अश्विनी माहेश्वरी) यांची निर्मिती असलेल्या  ''श्री राम समर्थ'' या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा नामांकित कलाकार अलका कुबल, शंतनू मोघे, नाशिक मधील हौशी कलाकार आणि समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित्यांच्या उपस्थितीत महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे नुकताच पार पडला. या प्रसंगी संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे, त्रंबक चे नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर,  चित्रपट निर्माते सुधीर कोलते, बडगुजर, तुषार गुप्ते, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, महर्षी चित्रपट संस्थेचे निशिकांत पगारे, प्रा. सोमनाथ मुठाळ आदी मंडळी उपस्थित होती. 
शुभ लग्न ''सावधान'' या शब्दामागील नेमके अर्थ समजावून देणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून  ￰प्राप्त केलेली सिद्धी हे संत रामदास स्वामींच्या आयुष्याचे￰ फार मोठे विशेष लक्षण आहे .स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे  पुरस्कर्ते  होते हे देखील सिनेमात पाहण्यास  मिळते. स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही संकल्पना त्यांनी चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजविली हाेती जी आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे व भरकटलेल्या समाजास त्यांनी सतत वैचारिक मार्गदर्शन केले आहे. 

बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा तत्कालीन तसेच आजच्या समाजातील परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमके भाष्य करतात. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ''श्री राम समर्थ'' या सिनेमाची प्रस्तुती भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी  केली आहे. कथा- पटकथा - संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केले आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, संगीत महेश नाईक आणि संजय मराठे यांनी दिले आहे. परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा असा हा llश्री राम समर्थ ll सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तमाम  विचारी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा रंजक तसेच उदबोधक आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली व आतुरतेने वाट पाहत असल्याची चर्चा सर्वत्र होती. 
Generations of Marathi households have conserved the invaluable heritage of teachings of national saint Ramdas Swami imbibed on their hearts. His writing ‘Dasbodh’ acts as a guidebook in today’s tough times. The biopic of Samartha Ramdas Swami, ‘Shri Ram Samartha’ will unfold many of such strands of his guidance. Poster and trailer release ceremony of the film “Shri Ram Samartha” conceptualized by Nashik’s famous lawyer Mrs. Vijaya Maheshwari, made with the hard work of Mr. Prakash Survase and produced by Disha Deepa Films (Deepa Survase) and Vipra Entertainment (Ashwini Maheshwari) was recently held in Mahakavi Kalidas Kalamandir, Nashik in the presence of renowned artists Alka Kubal, Shantanu Moghe, other local artists and dignitaries. This event was attended by musician Shrikrishna Chnadrate, Nagaradhakshya of Trimbak Purushottam Lohgaonkar, film producer Sudhir Kolte, Badgujar, Tushar Gupte, chairman of Vishwas Bank Vishwas Thakur, Nishiknat Pagare of Maharshi Film Organization and Prof. Somnath Muthal.
The 12 year old liitle Narayan who explains the meaning between the lines “shubha lagna ‘saavdhaan’” to the sage who acquired the Siddhi by his sheer knowledge and the deep devotion of Lord Rama, are two distinctive features of Samartha Ramdas Swami’s life. Film also shows that he was the true proponent of women’s empowerment and dignity. He imbibed in the society, the concept that ‘a clean environment fosters an enriched community’ four hundred years ago, and yet it is still relevant. He also has always provided thoughtful guidance to the community whenever it has strayed from the noble path. This film bears a unique glint due to superb and lively acting done by distinguished actors. This film, beyond being just a biopic of Ramdas Swami, is a witty commentary on contemporary status of our society. The historical incidences depicted in the film speak clearly about good governance and leadership. The film ‘Shri Ram Samartha’ with Santosh Todankar’s direction, is presented by Bharati Jhumbarlal Rathi and Sanjay Rathi. Story, script and dialogues are by Prakash Jadhav, Manoj Yerunkar and Vitthal Ambure. Photography is by Sameer Athlye, editing by Subodh Narkar, art by Mahendra Raut and music by Mahesh Naik & Sanjay Marathe. The audience will be soon greeted by the film ‘Shri Ram Samartha’ which underlines the basic principles required to lead a fulfilling life. This film should definitely prove entertaining, enlightening and encouraging to the thinking audience. After the ceremony, the audience expressed that they are eagerly waiting for this film and they wished for an early release.

No comments:

Post a Comment