Friday, 14 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १९ ! शिवानी सुर्वेची बिग बॉसना लवकर घरी पाठवण्याची विनंती बिग बॉस मराठीच्या घरात पाणीपुरवठा बंद


मुंबई १४ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात शिवानी सुर्वे बरीच चर्चेत आली आहे... आता सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष एकाच गोष्टीवर कालपासून केंद्रित झाले आहे ते म्हणजे शिवानी सुर्वेने बिग बॉसना केलेली विनंती. शिवानीला लवकरात लवकर बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जायचं आहे... परंतु अजूनही बिग बॉसनी यावर कोणताही निर्णय सांगितला नाहीये... शिवानीने काल देखील बिग बॉस आणि बिग बॉसच्या संपूर्ण टीमची माफी मागितली... आणि आज देखील शिवानी बिग बॉसना हिच विनंती करताना दिसणार आहे. आता बिग बॉस यावर काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल... तसेच बिग बॉसनी आज घरातील पाणीपुरवठा बंद करणार असून सर्व सदस्यांना घरात असलेला पाणीसाठा स्टोर रूममध्ये ठेवण्यास सांगणार आहेत... आता पाण्याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य काय योजना करतील हे आज कळेल ... 
बिग बॉस मराठीच्या घरात काल काय घडले ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये काल घरातील सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली. दिंगबर नाईक यांना टास्कमध्ये शिक्षक असलेल्या टीमने पास केले... वैशाली म्हाडेने संगीत क्लासमध्ये सुंदर अशी गाणी तिच्या मधुर आवाजात ऐकवली... तर परागच्या तासात ऐकवलेल्या एक प्यार का नग्मा है या गाण्यामुळे सगळे सदस्य भावूक झाले. अभिजीत केळकर याने बिग बॉसला नेहा विषयी तक्रार केली, काही सदस्य करत असलेल्या कटकटीमुळे बाकीचे सदस्य टास्क हवा तसा खेळता येत नाही... शिक्षक झालेल्या टीमने काल विद्यार्थी बनून BB विद्यालयात बराच दंगा केला... अभिजीत बिचुकले यांना इंग्लीश शिकवायची जबाबदारी सोपवली होती आणि या क्लासमध्ये विणा आणि परागने बिचुकले यांना त्यांच्या इंग्लीशवरून बरेच चिडवले. विणाला काल अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या क्लास मध्ये दंगा केल्याने तर नेहाने परागला नापास केले...
आज टास्क मध्ये काय होणार कोण नापास आणि कोण पास होणार आणि कोण घराचा कॅप्टन होणार हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment