मुंबई : मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित अशी इराणी कॅफे आणि बार साखळी ‘सोडाबॉटलओपनरवाला’ने नियमितपणे मुंबईच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यासाठी त्यांच्यामार्फत अनोखे कार्यक्रम, समारंभ आणि अनुभव यांचे आयोजन केले जाते.
मुंबईचा ऐतिहासिक वारसा साजरा करण्याच्या आपल्या संस्कृतीला अनुसरून ‘सोडाबॉटलओपनरवाला- हा यस्ट्रीट फिनिक्स’ शेफ पार्टनरतर्फे शहरात आणखीन एक कार्यक्रम साजरा केला गेला. शहरातील एक सर्वात जुना समाज ‘डब्बेवाल्यां ’च्या सन्मानार्थ हे आयोजन केले जात आहे कारण शहरातील कधीही मागे न पडणाऱ्या उद्योजकतेचे खऱ्या अर्थाने ते प्रतिनिधित्व करतात. हे आयोजन ‘सोडाबॉटलओपनरवाला-हायस्ट्रीट फिनिक्स’ची शेफ पार्टनर अनायदा परवानेह यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. मुंबईकरांना त्यांचे जेवण वेळेवर मिळावे म्हणून डब्बेवाले जे अथक कष्ट करतात त्याचा फार मोठा प्रभाव अनायदा यांच्यावर आहे.
‘डब्बावाला’ या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मध्ये नुकतेच डब् बेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री उल्हास शांताराम मूके, ,रामदास करवंदे, सोपान मरे तसेच चित्रकार अभिजीत किणी, इरफान पबाने, अतुल रुईया, गायत्री रुईया, पॅलॅडीयम चमू आणि ‘सोडाबॉटलओपनरवाला-हायस्ट्रीट फिनिक्स’ची शेफ भागीदार अनायदा परवानेह यांच्या उपस्थितीत करण् यात आले. ‘डब्बावाला’ नावाच्या या कॉमिक पुस्तकाची निर्मिती चित्रकार अभिजीत किणी यांची असून हे पुस्तक डब्बेवाल्यांच्या जीवनावर प्रेरित आहे. शहरातील या खऱ्याखुऱ्या सुपरहिरोना ते समर्पित करण्यात आले आहे.
“साधारण एक दशकापूर्वी सुरू झालेल्या ‘शेअर माय डब्बा’ या त्यांच्या उपक्रमापासून मी या डबेवाल्यांचा खराखुरा फॅन झाली आहे. त्यांना मानवंदना ठरेल असे काहीतरी भव्य करण्याचा माझा गेली कित्येक वर्षांचा मानस होता आणि ती संधी आता साधली गेली आहे. त्यांच्या सन्मानार्थ ‘सोडाबॉटलओपनरवाला’म ध्ये आम्ही आमचे लोकप्रिय ‘धानसाक’ एका खास डब्यामध्ये ग्राहकांना देतो. मुंबईचे डब्बेवाले हे मुंबईचे खरेखुरे स्पिरीट लोकांसमोर पूर्ण ताकदीनिशी आणतात. आणि म्हणूनच ते खर्या अर्थाने आमचे सर्वोत्तम असे हिरो आहेत,” असे उद्गार ‘सोडाबॉटलओपनरवाला-हायस् ट्रीट फिनिक्स’ची शेफ भागीदार अनायदा परवानेह यांनी काढले.
या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन डब्बेवाले, चित्रकार अभिजीत किणी, पॅलॅडीयम चमू आणि सोडाबॉटलओपनरवाला चमूच्या उपस् थितीत करण्यात आले. पॅलॅडियमने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा भाग म्हणून हा समारंभ पार पडला. या प्रदर्शनामध्ये प्रख्यात चित्रकार वलय शेंडे यांच्या मुंबईला समर्पित कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील एक डबेवाल्यांचे शिल्प होते. शहरातील प्रत्येकाला गेली कित्येक वर्षे अथकपणे वेळेवर डब्बा पोहोचवणारे हे आमचे खरेखुरे सुपरहिरो आहेत.
ए-4 आकाराच्या शैलीमध्ये हे कॉमिक पुस्तक साकारले गेले असून त्याची सुरुवात एका मुलाच्या संवादाने होते. हा मुलगा घरी येतो आणि त्याच्या वडिलांना ‘सुपरहीरो’वरील एका प्रकल्पामध्ये मदत करण्याची विनंती करतो. स्पायडरमॅन कि सुपरमॅन या दोघांमधून कोणावर ही कथा असावी, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. मात्र त्याचे वडील त्याला ‘मुंबईचे डब्बेवाले’ हे सुपरहिरो असू शकत नाहीत का, असा प्रश्न विचारतात. ते वडील त्यांच्या मुलाला हे सुपरहिरो का आहेत, त्याबद्दल विस्ताराने सांगतात. शेवटी तो मुलगा त्याच्या आवडत्या सुपरहिरोंबरोबर म्हणजे डब्बेवाल्यांबरोबर एक सेल्फी घेतो आणि पुस्तकाची सांगता होते.
हे कॉमिक पुस्तक ‘सोडाबॉटलओपनरवाला’च्या शहरातील सर्व दुकानांमध्ये १०० रुपयांना उपलब्ध असेल. हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. पुस्तकांच्या विक्रीतून उभा राहणारा निधी हा डब्बेवाल्यांना देणगीरूपात देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment