मुंबई १६ जून, २०१९ : बिग बॉस मराठी WEEKEND चा डावमध्ये सदस्यांनी आठवडाभर घातलेला गोंधळ, भांडण, टास्क यावर महेश मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. बिग बॉस मराठी मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेली शिवानी सुर्वेने दोन - तीन दिवस जो काही गोंधळ घातला, त्यावर शिवानी सुर्वेलादेखील महेश मांजरेकरांनी कडक शब्दांत समज दिली. शिवानीची बिग बॉस मराठीच्या घरातून एक्सिट झाली आणिघरामध्ये सिझनमधली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. हीना पांचाळची घरामध्ये धम्माकेदार एन्ट्री झाली... हीनाने उत्कृष्ट नृत्यांगणा, अभिनेत्री आणि मॉडेल आहे... महेश मांजरेकरांनी हीनाला विचारले ग्रँड फिनाले मध्ये कोण असेल त्यावर ती म्हणाली तिला स्वप्न पडले पराग कान्हेरे आणि अभिजीत बिचुकले मला स्टेजवर घेऊन आले, म्हणजेच पराग, अभिजीत तिच्यासोबत हे अंतिम फेरीत असतील असे तिने सांगितले. तर दिंगबर नाईक, सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे या ग्रँड फिनालेमध्ये मला दिसत नाही असेदेखील तिने सांगितले. हीनाच्या घरात येण्याने काय होणार ? ती कोणत्या ग्रुप मध्ये जाणार ? तिचा घरातला वावर कसा असेल ? प्रेक्षकांची मने ती जिंकू शकेल ? हे लवकरच कळेल. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
अभिजीत बिचुकलेंनी हीनाची ओळख घरातील सदस्यांची करून दिली. कालच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकलेमध्ये वादाची ठिणगी उडाली... विणाबरोबर टास्क दरम्यान आणि घरामध्ये सुरु असलेला वाद त्यांनी महेश मांजरेकरांना सांगितला... आणि विणाने देखील तिचे स्पष्टीकरण दिले... त्यानंतर पराग आणि अभिजीत बिचुकले यांमध्ये पराग सेफझोनमध्ये तर बिचुकले डेंजरमध्ये असे प्रेक्षकांना सांगितले. या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर हे आज कळेल...
आज बिग बॉस मराठी सिझन २ WEEKEND चा डावमध्ये काय घडेल ? हे कोण एलिमनेट होईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे...
No comments:
Post a Comment