मुंबई १७ जून,२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल दिगंबर नाईक घराबाहेर पडले... आज बिग बॉसच्या घरामध्ये काय होईल ? कोणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नवीन सदस्य भरती झाली आहे आणि ती म्हणजे हीना पांचाळ... आज होणाऱ्या टास्कमध्ये ती कोणती भूमिका घेईल,होणाऱ्या वाद – विवादांना कसं उत्तर देईल ? हे कळेलच... कारण, बिग बॉसच घर प्रत्येक सदस्याला प्रत्येक दिवशी येणाऱ्या संकंटाना कसं सामोर जावं हे शिकवत असत...
शिव आणि परागमध्ये वाद :
नेहा आणि शिवमध्ये झालेल्या धक्काबुक्कीतून नेहा खाली पडली... नेहाने वेळोवेळी शिवला थांबायला सांगितले परंतु नेहाचे शिवने ऐकले नाही... टास्क दरम्यान अशा गोष्टी होताना बऱ्याचदा पाहायला मिळतात. परंतु याच टास्क दरम्यान घरामध्ये शिव आणि पराग मध्ये वाद होताना दिसणार आहे... परागला ही गोष्ट पटली नाही आणि त्यामुळे ती त्याने शिवला सांगण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच दोघांमध्ये वाद रंगला. परागचे म्हणणे होते, नेहा पडली आणि ती त्याचा मोठा issue करू शकते आणि ते शिववर शेकेल आणि हे तो त्यांच्या टीमला देखील सांगत होता. तर शिवने परागला शांत बसायला सांगितले आणि शिवचे हेच वागणे आणि बोलणे परागला पटले नाही... परागने शिवला सांगितले मी तुला चांगला सल्ला देतो आहे, पण मला शिकवू नकोस असे शिवचे म्हणणे... मी नेहाची माफी मागितले आहे आणि शनि – रविच्या भागामध्ये काय होईल त्याला मी समोर जाईन, मी बघेन काय करायचं... शिवला पराग म्हणाला पुढच्या वेळेस अस वागताना विचार कर, शिवच म्हणण होत मी कृती केल्यावर विचार करत नाही, त्यावर परागने सांगितले मग आम्हांला विचार करावा लागेल... असे बोलल्याने शिवने सांगितले “मला धमकी देऊ नकोस... आता वाद कुठवर गेला हे आज बघायला मिळेल.
आता टास्कमध्ये काय होईल हे आज प्रेक्षकांना दिसेलच... जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment